धक्कादायक! परस्पर वारसांची खोटी नावे लावली..अन् कोट्यवधींचा टीडीआर घेतला..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

नाशिक शिवारातील सर्व्हे क्रमांक 232 मधील पंचवीस एकर क्षेत्र चंपादेवी शर्मा यांच्या मालकीचे होते. कालांतराने ही जागा प्रीतमचंद हरिचंद वालिया यांनी खरेदी केली. 1977 मध्ये क्वालालांपूर येथील विमान दुर्घटनेत वालिया यांचा मृत्यू झाला. वालिया यांच्या कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या व्यवस्थापकाने वारसदार म्हणून तलाठ्याला हाताशी धरून सातबारा उताऱ्यावर पत्नी मनोरमा दावल यांचे नाव लावून घेतले.

नाशिक : पंचवटी विभागातील नाशिक शिवारात सर्व्हे क्रमांक 232 च्या जागेवर परस्पर वारसांची खोटी नावे लावून त्या आरक्षित जागेचा कोट्यवधींचा टीडीआर घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या जागेच्या बदल्यात टीडीआर घेताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांचाही हात असल्याचे समोर येत आहे. या संदर्भात शासनपातळीवर तक्रार केल्याने जागेचा व्यवहार करणाऱ्यांसह टीडीआर घोटाळ्यात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

असा घडला प्रकार...

नाशिक शिवारातील सर्व्हे क्रमांक 232 मधील पंचवीस एकर क्षेत्र चंपादेवी शर्मा यांच्या मालकीचे होते. कालांतराने ही जागा प्रीतमचंद हरिचंद वालिया यांनी खरेदी केली. 1977 मध्ये क्वालालांपूर येथील विमान दुर्घटनेत वालिया यांचा मृत्यू झाला. वालिया यांच्या कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या व्यवस्थापकाने वारसदार म्हणून तलाठ्याला हाताशी धरून सातबारा उताऱ्यावर पत्नी मनोरमा दावल यांचे नाव लावून घेतले. वालिया यांनी जागेचा सांभाळ करण्यासाठी व जागेचा व्यवहार करण्यासाठी रामकृष्ण उगले यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर ही जागा प्रकाश सूर्यवंशी व सुहास रामकुमार गिरी या विकसकांना जीपीद्वारे विकण्यात आली. या बदल्यात लाखोंचा व्यवहार करण्यात आला. सूर्यवंशी व गिरी यांनी याच जागेवरून अनेकांशी व्यवहार केले. आरक्षित जागेच्या बदल्यात महापालिकेकडूनही कोट्यवधींचा टीडीआर घेतला. यात महापालिकेचे अधिकारीदेखील सहभागी असल्याचे या संदर्भात शासनाच्या नगरविकास खाते व महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे पत्रव्यवहार करणाऱ्या सचिन दफ्तरे यांनी सांगितले. दरम्यान, मंत्रालयात तक्रार पोचल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे महासभेत या विषयावर वाद रंगण्याची चिन्हे आहेत. 

हेही वाचा > धरणावर फिरायला आलेले पर्यटक गाडीपाशी गेले..अन् गाडीत पाहिल्यावर धक्काच...कारण..

शासनाकडे तक्रार, महासभेत मुद्दा गाजणार 

सातबारा उताऱ्यावर खोटी नावे लावून आर्थिक फसवणूक करताना महापालिकेकडूनदेखील टीडीआर स्वरूपात मोबदला प्राप्त करून घेण्याची बाब गंभीर आहे. महासभेच्या पटलावर हा विषय आणून सखोल चौकशी करू. - जगदीश पाटील, गटनेते, भाजप 

भविष्यात लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून पुराव्यानिशी नगरविकास व आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई व्हावी. - सचिन दफ्तरे, तक्रारदार 
 

हेही वाचा > मुलीची देहविक्री...भरपूर पैसा..असे स्वप्न आईवडिलांचे..पण...

 शिक्षकाच्या खोलीतून वाफा बाहेर येत होत्या... त्यांनी खिडकीचा कप्पा उघडून पाहिला तर धक्काच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: showing wrong heritor in TDR scam in the panchavati Nashik Crime Nashik News