Nandurbar News : विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेत अर्ज करण्याचे आवाहन

Students are invited to apply for Education Loan Interest Repayment Scheme nandurbar news
Students are invited to apply for Education Loan Interest Repayment Scheme nandurbar newssakal
Updated on

Nandurbar News : महाराष्ट्र राज्य इतरमागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी राज्य व देशांतर्गत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरु केली असून या योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे नंदुरबार जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे. (Students are invited to apply for Education Loan Interest Repayment Scheme nandurbar news)

राज्यातील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य व देशांतर्गत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १० लाख तर परदेशी अभ्यासक्रमासाठी २० लाख बिनव्याजी शैक्षणिक कर्ज योजना सुरु केली आहे.

बँकेने कर्ज मंजूर केलेल्या कर्जाचे विद्यार्थ्याने वेळेत हप्ते भरल्यास त्यामधील व्याजाची रक्कम १२ टक्क्यांच्या मर्यादेत विद्यार्थ्यांच्या आधार लिंक खात्यात महामंडळामार्फत व्याज परतावा जमा करण्यात येईल.

यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी व इतर मागास प्रवर्गातील असावा, अर्जदाराचे वय १७ ते ३० असावे. बारावीत ६० टक्के गुणांसह पास असलेले विद्यार्थी पात्र राहतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Students are invited to apply for Education Loan Interest Repayment Scheme nandurbar news
11th Admission Deadline : अकरावी तिसऱ्या फेरीच्‍या नोंदणीची उद्यापर्यंत मुदत

पदवीच्या द्वितीय वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ६० टक्के गुणासह पदविका तसेच, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ६० टक्के गुणासह उत्तीर्ण असावा.

अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागाकरिता आठ लाख असावे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने www.msobcfdc.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, टोकर तलाव रोड, नंदुरबार ( ०२५६४-२१००६२ ) येथे संपर्क साधावा.

Students are invited to apply for Education Loan Interest Repayment Scheme nandurbar news
Nandurbar News : पेसा वितरण दाखल्यांचे कामकाज 10 जुलैपर्यंत बंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.