Market Committee Election : बेरजेच्या राजकारणाने तळोदा बाजार समिती बिनविरोध

Market Committee Election
Market Committee Electionesakal

Nandurbar News : बाजार समिती निवडणुकीत आमदार राजेश पाडवी यांनी दाखवलेल्या बेरजेचा राजकारणामुळे बाजार समिती बिनविरोध होण्यास मदत झाली असल्याचे बोलले जात आहे. (Taloda Market Committee Election unopposed due to politics of sums nandurbar news)

त्यात आमदार राजेश पाडवी यांनी माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्याच पावलावर पाऊल ठेवून बाजार समिती बिनविरोध करून दाखवली आहे. मात्र त्यांच्याप्रमाणेच आमदार राजेश पाडवी स्वतः सभापतीपदी राहतील की अन्य कोणाला संधी देतील याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे हित लक्षात घेऊन सर्वपक्षीय संचालक निवडले जाण्याची परंपरा यंदा देखील कायम राहिली आहे. त्यात तालुक्यात गटप्रमुख म्हणून निवडणूक लढवून स्वतः व आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची क्षमता मोजक्याच नेत्यांकडे होती. त्या नेत्यांमध्ये तालुक्यात माजी आमदार उदेसिंग पाडवी, माजी नगराध्यक्ष भरत माळी यांना गटप्रमुख म्हणून पाहिले जाते.

त्यांनी नगरपालिका असो अथवा सहकारी संस्था तेथे आपल्या नेतृत्वात निवडणुका लढवून जिंकल्या देखील आहेत. मात्र तालुक्याचा राजकारणात कधीही कमालीची कटुता येऊ दिलेली नाही. त्यामुळे निवडणूक संपली की सर्वांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध राहिले आहेत. त्यामुळेच बाजार समितीत देखील मागील अनेक वर्षांपासून बिनविरोधाची परंपरा टिकली होती असे बोलले जाते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Market Committee Election
Market Committee Election : बाजार समितीची निवडणूक होणार की पुन्हा लांबणार?

सर्वपक्षीय नेत्यांशी समन्वय

आमदार राजेश पाडवी यांनीही तोच सलोख्याचा व मैत्रीचा कित्ता गिरवत सर्व पक्षाच्या नेत्यांशी समन्वय साधून बाजार समिती बिनविरोध केली आहे. त्यामुळे त्यांच्याच नेतृत्वात बाजार समितीची पुढील वाटचाल राहणार आहे. आता ते स्वतः देखील बाजार समितीत संचालक आहेत. त्यामुळे ते सभापती पदी विराजमान होतील काय याचीच उत्सुकता आहे की इतर कोणाला ते संधी देतील यावर तालुक्यात चर्चा सुरू आहेत.

बाजार समितीचे साधले हित

बाजार समिती बिनविरोध करण्यासाठी आमदार राजेश पाडवी , आमदार आमश्या पाडवी, माजीमंत्री पद्माकर वळवी, माजी आमदार उदेसिंग पाडवी, माजी नगराध्यक्ष भरत माळी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, डॉ. शशिकांत वाणी, योगेश चौधरी, जितेंद्र दुबे, जितेंद्र सूर्यवंशी, योगेश मराठे, अनुप उदासी, गौतम जैन या सर्वांचे सलोख्याचे संबंध कामी आले आहेत. त्यात बेरजेचे राजकारण असल्याने त्यातच बाजार समितीचेही हित साधले गेले असल्याचे बोलले जात आहे.

Market Committee Election
Market Committee Election : धडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com