Dhule News : कुसुंब्यात तालुका काँग्रेसची निदर्शने; अदानी, भाजप सरकार निषेधार्थ घोषणाबाजी

Taluka Congress protest in Kusumba to protect public money and against Centre dhule news
Taluka Congress protest in Kusumba to protect public money and against Centre dhule newsesakal

धुळे : केंद्रातील भाजपचे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या धोरणामुळे सर्वसामान्य, गरिबांचा पैसा धोक्यात आला आहे.

उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांना स्टेट बँक आणि एलआयसीमधील पैसे हे उद्योगात गुंतविण्यास केंद्र सरकारने मदत केली. (Taluka Congress protest in Kusumba to protect public money and against Centre dhule news)

उद्योजक गौतम अदानी यांचा महाघोटाळा उघड झाला आहे. त्यामुळे एलआयसी व स्टेट बँकेतील गरिबांचा पैसा धोक्यात आला आहे. जनतेचा पैसा सुरक्षित राहावा यासाठी आणि केंद्राविरोधात कुसुंबा (ता. धुळे) येथे तालुका काँग्रेसने आंदोलन केले.

प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. कुसुंबा, नेर परिसरासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले. केंद्रातील भाजप सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प अदानी समूहाला विकण्याचा सपाटा लावला आहे.

एलआयसी व एसबीआय या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमध्ये मध्यमवर्ग नोकरदार व सामान्य जनतेने गुंतविलेले कष्टाचे पैसे केंद्र सरकारने अदानी समूहात गुंतवायला भाग पाडले आहे. जनतेचा पैसा सुरक्षित राहावा व या घोटाळ्याचा पर्दाफाश व्हावा यासाठी कुसुंबा येथील एसबीआय बँकेच्या कार्यालयासमोर तासभर निदर्शने करण्यात आली.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Taluka Congress protest in Kusumba to protect public money and against Centre dhule news
Nashik Air Service : नाशिकच्या विमानसेवेसाठी आदित्य ठाकरेंची मध्यस्थी

जिल्हा समन्वयक प्रा. दत्ता परदेशी, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गर्दे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, डॉ. दत्ता परदेशी, ज्येष्ठ संतोष पाटील, संचालक राजेंद्र भदाणे, माजी सरपंच प्रदीप देसले, प्रा. दिलीप शिंदे, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल, बाजार समितीचे माजी संचालक अर्जुन पाटील,

सेवा संस्थेचे अध्यक्ष भगवान पाटील, सोमनाथ बागूल, पोपट शिंदे, संचालक कन्हयालाल पाटील, अतुल देशमुख, कुसुंब्याचे संजय शिंदे, दिगंबर परदेशी, माजी सरपंच सोमनाथ पाटील, माजी सरपंच धर्मराज बागूल, प्रा. डी. झेड. पाटील, चूडामण पाटील, श्यामकांत शिंदे, रामभाऊ परदेशी, विष्णू रायते, अशपाक शेख, दिनेश रायते, गुलाब शिंदे, भटू नेरकर, चिंटू शेख, ऋषी शिंदे आदी सहभागी झाले.

Taluka Congress protest in Kusumba to protect public money and against Centre dhule news
Dr. Bharati Pawar : मोडाळेसह 3 गावांना स्वतंत्र टपाल कार्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com