Nandurbar News : तहसीलदार डॉ. कुलकर्णी यांनी उमटविला कामाचा ठसा; नाशिकला बदली

The flower garden in the Tehsil office is becoming the attraction of the citizens and tehsildar kulkarni
The flower garden in the Tehsil office is becoming the attraction of the citizens and tehsildar kulkarni esakal

Nandurbar News : येथील तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांची नाशिक येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी त्र्यंबकेश्वर येथील तहसीलदार दीपक गिरासे यांनी पदभार स्वीकारला. दरम्यान, साडेतीन वर्षांच्या काळात तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचे कोविड काळातील काम वाखाणण्याजोगे होते. (Tehsildar Dr Milind Kulkarni has been transferred to Nashik nandurbar news)

त्याचबरोबर तहसील कार्यालयात आलेल्या जनसामान्यांचा अडचणी समजून घेऊन त्या तत्काळ मार्गी लागाव्यात यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याने तालुक्यात त्यांनी साडेतीन वर्षांच्या काळात आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटविला होता.

‘शासकीय काम म्हणजे बारा महिने थांब’ अशी म्हण जनमानसात रूढ झाली आहे; परंतु याला तिलांजली देऊन शेतकरी असो वा सर्वसामान्य नागरिक तहसील कार्यालयात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची आस्थेवाईकपणे विचारपूस करून प्रत्येकाचे काम तत्काळ झाले पाहिजे. विनाकारण ताटकळत बसू देऊ नका, असा आग्रह धरून डॉ. कुलकर्णी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांकडून तत्काळ काम करून घेत असत.

कोविड काळात लॉकडाउनमध्ये गरीब कुटुंबाना शिधावाटप, मास्क, सॅनिटायझर वाटप, वसतिगृहात क्वारंटाइन सेंटर उभारणी आदी कामे त्यांनी लीलया केली. याच दरम्यान स्वतःला कोविड झाला; परंतु त्यांनी त्याची तमा बाळगता तब्येत सुधारल्यावर पुन्हा आपले कार्य सदोदित चालू ठेवले. याच दरम्यान आपण अधिकारी आहोत, असा आविर्भाव कधीही त्यांनी आणला नसल्याचे नागरिक सांगतात.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

The flower garden in the Tehsil office is becoming the attraction of the citizens and tehsildar kulkarni
Dhule News : पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेतून धुळे-नंदुरबार जिल्ह्यांसाठी 20 कोटी

निवडणुका शांततेत

डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात विधानसभा निवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक व पोटनिवडणूक, ग्रामपंचायत सार्वत्रिक आधी निवडणुका शांततेत व कुठलाही अनुचित प्रकार न घडता पार पाडल्या. त्याचबरोबर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मतदारयादीशी आधार जोडणीचे काम केले.

तहसील कार्यालय परिसरात फुलविली बाग

येथील तहसील कार्यालयात तत्कालीन प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे व तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी याअधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्यातील सर्जनशीलता जपत तहसील कार्यालयाच्या आवारात विविध जातीची चक्क एक हजार ४६० रोपे घनवृक्ष लागवड करून परसबाग फुलविली आहे.

रोपे आता वृक्ष झाल्याने संपूर्ण परिसर फुलून निघाला आहे. बाग नागरिकांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे. शासकीय कार्यालय परिसरात रिकाम्या भूभागावर जैवविविधता राखून वृक्षसंपदा रुजविणे, वृक्षसंपदेचे संवर्धन करणे यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा विभागाचे तत्कालीन प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे व तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून महसूल विभाग व सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त प्रयत्नाने शहादा तहसील कार्यालय परिसरात सहा गुंठे जागेवर बाग फुलविण्यात आली आहे.

The flower garden in the Tehsil office is becoming the attraction of the citizens and tehsildar kulkarni
Nashik News : शहरात आत्महत्त्यांचे सत्र सुरूच; वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी घेतला गळफास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com