Dhule News : पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेतून धुळे-नंदुरबार जिल्ह्यांसाठी 20 कोटी

total fund of 20 crore has been approved for Dhule and Nandurbar districts
total fund of 20 crore has been approved for Dhule and Nandurbar districts esakal

Dhule News : नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. हीना गावित यांच्या पाठपुराव्यामुळे पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेतून धुळे व नंदुरबार जिल्ह्यांसाठी एकूण २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अंतुर्ली (ता. शिरपूर) येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण शिरसाट यांनी या निधीसाठी खासदारांकडे मागणी केली होती. (total fund of 20 crore has been approved for Dhule and Nandurbar districts under Pm Matsya Sampada Yojana shirpur news)

मंजूर निधीमधून धुळे जिल्ह्याचा वाटा १२ कोटी रुपयांचा असून, उर्वरित आठ कोटी रुपये नंदुरबार जिल्ह्यासाठी आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील एकूण २०० जणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती प्रवीण शिरसाट यांनी दिली.

मत्स्यपालन व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, त्यांचे जीवनमान विकसित व्हावे या हेतूने पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना राबविण्यात येते. २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या योजनेला भारताची नीलक्रांती असे म्हणून ओळखले जाते. या योजनेंतर्गत तालुकास्तरावर २५ युनिट बायोफ्लॉक बसवून तीन लघु रिसर्क्युलेटरी यंत्रणा कार्यान्वित केल्या जातात. त्यामुळे मत्स्यपालन करणाऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

total fund of 20 crore has been approved for Dhule and Nandurbar districts
Dhule Success Story : एकाच प्रयत्नात 5 स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण; सामान्य शेतकऱ्याच्या मुलाचा विक्रम!

मत्स्यसंपदा योजनेच्या लाभाबाबत प्रवीण शिरसाठ यांनी प्रचार-प्रसार केल्यानंतर धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मत्स्योत्पादकांनी त्यांच्याकडे योजनेचा लाभ मिळवून देण्याची विनंती केली. त्यामुळे शिरसाट यांनी खासदार डॉ. हीना गावित यांच्याकडे पाठपुरावा केला. खासदार डॉ. गावित यांनी केंद्रीय मत्स्योत्पादन विभागाकडे सातत्याने निधीविषयक मागणी लावून धरली. त्यामुळे धुळे-नंदुरबार जिल्ह्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. प्रवीण शिरसाट यांच्यासह परिसरातील मत्स्योत्पादकांनी डॉ. हीना गावित यांचे आभार मानले.

total fund of 20 crore has been approved for Dhule and Nandurbar districts
Dhule Market Committee Election : 10 आर जमीनधारक शेतकरी उमेदवाराचे 61 अर्ज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com