esakal | सुट्टीत घराबाहेर फिरायला गेले होते..पण घरी येताच 'त्यांना' धक्काच बसला..
sakal

बोलून बातमी शोधा

thief 1.jpg

सचिन शेटे यांच्या घराचे चोरट्याने कडीकोयंडे तोडून सुमारे दोन लाख 26 हजारांचा मुद्देमाल नेला. यात 60 हजारांचे सोन्याचे नेकलेस, 60 हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या, 50 हजार रुपयांची रोकड, 40 हजारांची चांदीची मूर्ती, 16 हजार रुपयांची रोकड असा ऐवज होता. या प्रकरणी अंबड पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सुट्टीत घराबाहेर फिरायला गेले होते..पण घरी येताच 'त्यांना' धक्काच बसला..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अंबड, गंगापूर रोड परिसरात घरफोडी करण्यात आली असून, इंदिरानगर व सरकारवाडा हद्दीतही दोन घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. शहरात चोऱ्या आणि घरफोड्यांचे सत्र वाढले असून, चोरट्यांना जेरबंद करण्यासाठीच्या कोणत्याही उपाययोजना पोलिसांकडून होत नसल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होतो आहे. 

साडेचार लाखांचा ऐवज चार घरफोडींतून लंपास 
सतीश नागपुरे (रा. रो-हाउस, रजत पार्क, स्वामीनगर, अंबड) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. 3) मध्यरात्री नागपुरे आणि त्यांच्या घरासमोर राहणारे सचिन शेटे यांच्या घराचे चोरट्याने कडीकोयंडे तोडून सुमारे दोन लाख 26 हजारांचा मुद्देमाल नेला. यात 60 हजारांचे सोन्याचे नेकलेस, 60 हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या, 50 हजार रुपयांची रोकड, 40 हजारांची चांदीची मूर्ती, 16 हजार रुपयांची रोकड असा ऐवज होता. या प्रकरणी अंबड पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गंगापूर रोडच्या अयोध्या कॉलनीतही सव्वा लाखाची घरफोडी झाली. प्रकाश खैरनार (रा. अयोध्या कॉलनी, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार मंगळवारी (ता. 3) रात्री साडेअकराच्या सुमारास लोखंडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी एक लाख 30 हजारांचा ऐवज नेला. यात 60 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र, 20 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र, 20 हजारांचे कानातील झुबे, 20 हजारांची सोन्याची अंगठी, 10 हजारांचे सोन्याचे नाणे, तीन हजारांची चांदीची समई, एक हजाराचा मोत्याचा हार असा ऐवज होता. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करणयात आला. 

हेही वाचा > आई फोनवर बोलत होती..अन् बाळ रांगत गेलं बाथरुममध्ये....नंतर आई येऊन बघते तर काय.....

शहरात चोरट्यांचा सुळसुळाट 
शशिकांत ठाकरे (रा. सिद्धिविनायक हौसिंग सोसायटी, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरदरम्यान त्यांच्या बंगल्यात कोणीही नसताना, चोरट्याने बंगल्याच्या दरवाजाचे लॉक तोडून 55 हजार 300 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. यात 15 हजारांचे सोन्याचे कडे, एक हजाराची सोन्याची नथ, तीन हजारांची सोन्याची अंगठी, सहा हजारांची सोन्याची पोत, 300 रुपयांची सोन्याची अंगठी, 30 हजार रुपयांची रोकड असा ऐवज होता. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अर्जुन गुप्ता (रा. भगवान निवास, घारपुरे घाट) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी मध्यरात्री चोरट्याने त्यांच्या वडिलांच्या खोलीचे लॉक तोडून सुमारे 50 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड असा ऐवज चोरला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा > मळ्यात गेलेले आजोबा-नातू परतलेच नाही...शोध घेतल्यावर ग्रामस्थांना धक्का...

> PHOTOS : कोंबडा माशाची मिजासच भारी!...'इतक्या' दराचा यंदा तुर्रा