Nandurbar News : गावे, पाडे गजबजू लागले; स्थलांतरित मजुरांची घरवापसी..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tribal laborers who had migrated for employment for last 5 to 6 months now started returning to village nandurbar news

Nandurbar News : गावे, पाडे गजबजू लागले; स्थलांतरित मजुरांची घरवापसी..!

कळंबू (जि. नंदुरबार) : पाच-सहा महिन्यांपासून रोजगारानिमित्त (Employment) विविध ठिकाणी स्थलांतर झालेले आदिवासी मजूर आता गावाकडे परतू लागले आहेत.

यामुळे ओस पडलेले पाडे, वस्त्या, गावे आता पुन्हा गजबजू लागला आहेत. (tribal laborers who had migrated for employment for last 5 to 6 months now started returning to village nandurbar news)

दसरा, दिवाळीच्या दरम्‍यान ग्रामीण भागातील बहुतेक आदिवासी मजूर रोजगारानिमित्त गुजरात व सौराष्ट्रासह कर्नाटक, जुनागड, सांगली, सातारा, पंढरपूर व परराज्यात उदरनिर्वाहसाठी कुटुंबासह स्थलांतर करतात. यामुळे बहुतेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात.

शहादा तालुक्यातील बहुतेक कुटुंबांच्या पाच, सहा महिन्यांपासून स्थलांतरामुळे गाव-पाडे ओस पडले होते. यामुळे स्थानिक व्यवसायिकांना याचा फटका सहन करावा लागला; परंतु गेल्या आठ, पंधरा दिवसांपासून स्थलांतरित कुटुंबे गावाकडे येण्यास सुरवात झाल्याने गावे, पाडे पुन्हा गजबजू लागल्याने स्थानिक व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

घरवापसी झालेल्या कुटुंबातील विद्यार्थिसंख्या वाढीमुळे शाळेतील विद्यार्थिसंख्याही वाढणार आहे. त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेले विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येणार आहेत, तर दुसरीकडे धडगाव तालुक्यातील बहुतांश मजूरवर्ग शहादा, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील विविध गावांत रोजगारानिमित्त स्थायी झाले आहेत.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

त्यामुळे मजूरटंचाई काही प्रमाणात दूर झाली होती. मात्र सध्या मजुरांची घरवापसी झाल्याने स्थानिक ठिकाणीच मजूर उपलब्ध होणार आहे. सध्या गहू, हरभरा, दादर कापणीचा हंगाम जोरावर सुरू असून, स्थानिक शेतकऱ्यांना ऐन वेळेस मजूर उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांची मजूर मिळविण्यासाठी भटकंती थाबणार आहे. तसेच पीककाढणीही वेळेवर होऊन शेतमालाला भावही योग्य मिळण्यास मदत होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. म्हणून सध्या तरी शेतकऱ्यांना मजूर मिळविण्यासाठी कसरत कमी प्रमाणात करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :NandurbarEmploymentTribal