Truck Accident
Truck Accidentesakal

Nandurbar : चालकाचे नियंत्रण सुटल्याने गोमाई नदीत ट्रक कोसळला

शहादा (जि. नंदुरबार) : शहादा-पाडळदा रस्त्यावरील गोमाई नदीच्‍या पुलाला संरक्षण कठडे नसल्याने वारंवार अपघात (Accident) घडत आहेत. शुक्रवारी (ता.१०)पहाटेच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने एक मालवाहू ट्रक (Truck) नदीपात्रात कोसळला. यात सुदैवाने जीवित हानी झाली नसून, चालक व सहचालक जखमी झाले आहेत. दरम्यान, पुलाला संरक्षण कठडे उभारण्यात यावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (Truck crashes into Gomai river Nandurbar News)

शहादा-पाडळदा रस्त्यावर दहा चाके असलेला ट्रक (एमएच ३९ एबी ०३९१) तालुक्यातील पाडळदा येथे रासायनिक खतांच्या पिशव्या रिकाम्या करून येत होता. शहराजवळील गोमाई नदीच्या पुलावरून जात असताना पहाटे चालकाचा ताबा सुटल्याने पुलाला संरक्षक कठडे नसल्याने ट्रक सरळ खाली नदी पात्रात कोसळला. ट्रक कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. नदी काठा जवळ राहणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रक चालक व त्याच्या सहकाऱ्याला बाहेर काढले. ट्रक शहादा शहरातील तकिया बाजार वसाहतीतील जुबेरभाई भंगारवाले यांचा असून त्यांनी पोलिसात घटनेची माहिती दिली. गेल्या पंधरा वर्षापासून या पुलाला संरक्षक कठडे नाहीत. पुलाखाली बेड कॉंक्रीट उखडल्याने मोठ मोठे खड्डे झाले आहेत. ते बुजविण्याची मागणी केली आहे.

Truck Accident
वादळी पावसाने डाळिंबाग भुईसपाट

कठडे बसवा अन्यथा आंदोलन

शहरा जवळून वाहणाऱ्या गोमाई नदी पात्रावर असलेल्या पुलाला संरक्षण कठडे नसल्याने आज पर्यंत अनेक अपघात झाले आहे. त्याचबरोबर पुलाखालील अप्रोन काँक्रिटीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे. गेल्या २५ वर्षांपूर्वी पाडळदा रस्त्यावर गोमाई नदीपात्रात कमी उंचीच्या पुलाचे काम करण्यात आल्याने अपघात घडत आहेत.

Truck Accident
ताडपत्रीचे दर कडाडले; शेतकरी वर्ग वळला बॅनर खरेदीकडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com