Vegetable Market Rates: कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर हे कृषिप्रधान जिल्हे म्हणून ओळखले जातात; परंतु या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. पिके टिकवण्यासाठी, पाण्यासाठी प्रचंड खर्च करावा लागत असल्याने सांगली व सोलापुरातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोल्हापुरातील शेतकऱ्यांना भाजीपाल्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने पिके शेतातच पुरून टाकण्याची वेळ येत आहे.