Dhule News : ‘स्वच्छता दूत’ गिधाड नामशेष होण्याच्या मार्गावर?

Vulture birds
Vulture birdsesakal

Dhule News : निसर्गात ‘स्वच्छता दूत’ म्हणून ओळख असणारे गिधाड पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावरच काय नामशेष झाल्याचे चित्र आहे. मेलेल्या प्राण्यांच्या मृतदेहावर उदरभरण करणारे गिधाडे आज दिसेनासे झाले आहेत. (Vultures are on verge of extinction dhule news)

राज्यात नोंद झालेल्या सहाशेच्या जवळपास असलेल्या पक्षी प्रजातींपैकी किमान ६२ प्रजाती आज संकटात असल्याचे चित्र आहे. त्यात गिधाडांचाही समावेश आहे.

निसर्गात स्वच्छता दूत म्हणून ओळख असणारे गिधाड पक्षी नामशेष झाली आहेत. अन्नसाखळी एकमेकांवर अवलंबून असते. यातील एकही घटक निखळला तर अन्नसाखळी ढासळण्याची शक्यता असते. गिधाडेही अन्नसाखळीतील दुसऱ्या जिवावर अवलंबून असणारा पक्षी आहे. ते केवळ मेलेल्या प्राण्यांच्या मृतदेहांवर उदरभरण करतात.

म्हणून त्यांना ‘मृतभक्षक’ म्हणतात. जगभरात गिधाडांच्या २३ प्रजाती आढळतात. त्यापैकी भारतात दाढीवाले गिधाड (‘बीअर्डेड’), काळे गिधाड ‘सीनरस’, पांढरे गिधाड ‘इजिप्शियन’, ‘युरेशियन’, ‘हिमालयीन ग्रिफॉन’, लांब चीचीचे गिधाड ‘लॉन्ग बिल्ड’, राज गिधाड ‘रेड हेडेड’, ‘स्लेंडर बिल्ड’, ‘ओरिएंटल व्हाइट बॅक व्हल्चर’ या नऊ प्रजाती सापडतात. गरुडापेक्षा गिधाड हा पक्षी आकाराने मोठा, ताकदवान असतो. तरी गिधाड शिकार करत नाही. त्यामुळे त्याचा समावेश गरुड, ससाणा, घारीसारख्या शिकारी पक्ष्यांच्या यादीत होत नाही.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Vulture birds
Social Media Addiction : रिल्समधील तुमची ओळख आहे आभासी; व्यसन ठरणार घातक...!

डायक्लोफिनॅकमुळे गिधाडावर संक्रांत..!

एकेकाळी गिधाडांची संख्या चांगली होती. गेल्या काही वर्षांत त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. गिधाडे नामशेष होणार की काय, अशी भीती निसर्गअभ्यासकांना वाटू लागली आहे. ‘डायक्लोफिनॅक’ या मानव व जनावरांमध्ये वेदनाशामक म्हणून वापरल्या जाणाऱ्या औषधांचा अतिरेकी वापर ही औषधे घेऊन अनेक जनावरांसारखे प्राणी मरतात. त्यांचे सांगाडे, मांस गिधाडांच्या खाण्यात आल्यावर तीदेखील मृत्यूमुखी पडतात.

भारतात ‘पांढरपाठी गिधाड, राज गिधाड, युरेशियन गिधाड, हिमालयीन ग्रिफोन, पांढरे गिधाड (इजिप्शियन गिधाड), काळे गिधाड (सिनेरियस गिधाड), लांब चोचीचे गिधाड या जाती आढळून येतात. राज्यात गिधाडांच्या अनेक प्रजातींची नोंद झाली असली तरी भारतीय, पांढऱ्या पुठ्ठ्याची, लांब चोचीची, हिमालयीन ग्रिफॉन आणि पांढरी गिधाडे प्रामुख्याने आढळतात.

"धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीस वर्षांपूर्वी पांढऱ्या पाठीच्या, लांब चोचीच्या गिधाडांची संख्या मोठी होती. सध्या अपवाद म्हणून लळिंग कुरण, सोनवद व नकाणे परिसरात गिधाड नजरेस पडतात." -हिमांशू टेंबेकर, पक्षीतज्ज्ञ, धुळे.

"निसर्गाचा समतोल राखणाऱ्या गिधाड पक्ष्यांचे जतन, संवर्धन झाले पाहिजे. भविष्यात हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे." -मेघ:श्याम बोरसे, ग्राम विकास अधिकारी तथा पक्षीमित्र

Vulture birds
Animal Bird Survey : सातपुड्याच्या दऱ्या-खोऱ्यात सर्वाधिक मोरांचा अधिवास; बुद्ध पौर्णिमेला गणना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com