नवापूर : कारचा टायर फुटल्याने अपघातात महिला ठार

कारचा अचानक टायर फुटल्याने कार पलटी झाली अन् त्यात महिलेच्या डोक्याला जबर मार लागला.
Accident
Accidentesakal

नवापूर : सावरट (ता. नवापूर) गावालगत राष्ट्रीय महामार्गावर अर्टिगा कार (जीजे ५ जेपी ९९२०) चा टायर फुटल्याने शनिवारी (ता.२८) दुपारी सव्वाच्या सुमारास अपघात झाला. त्यात एक महिला जागीच ठार झाली.

कुंझर (ता. चाळीसगाव ) येथून सूरत जात असताना कारचा अचानक टायर फुटल्याने कार पलटी झाली. त्यात गाडीत बसलेल्या दीपाली श्यामराव पवार (वय ३२) महिलेला डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेले दिलीप शिवाजी चित्ते, मुलगा रोहित श्यामराव पवार (वय ९) चालक हरिभाई पटेल जखमी झाले आहेत.

Accident
शेतीत नुकसान अन् बॅंकेच्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

नवापूर पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, पोलिस उप निरीक्षक अशोक मोकळ, सोमनाथ महाले, गोविंद मोरे, प्रकाश सैंदाणे, अनिल मोरे, संजय सोनवणे घटनास्थळी दाखल झाले. मृत दीपाली पवार व जखमींना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप गावित यांनी जखमींवर उपचार केले. अपघाताबाबत नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळं, प्रवीण कोळी, हवालदार विकास पाटील, अल्ताफ शेख पुढील तपास करत आहेत.

Accident
विवाहाचे आमिष दाखवून वरपित्याची फसवणूक; वधूसह 2 जणांविरोधात गुन्हा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com