वटपौर्णिमेला सातजन्माच्या गाठी बांधल्या पुनर्विवाहात

Wedding ceremony of kalpesh & sheetal
Wedding ceremony of kalpesh & sheetalesakal

कापडणे (जि. धुळे) : आज वटपौर्णिमेला (Vat Purnima) प्रत्येक सौभाग्यवती महिला वडाची पूजा व सात फेऱ्या मारून साता जन्मी हाच पती मिळावा, म्हणून साकडे घालत असते. आजच्या विशेष दिनी पढावद (ता.शिंदखेडा) येथील प्रथम वर कल्पेश ठाकरे व विधवा शीतल पाटीलचा (कापडणे, ता.धुळे) पुनर्विवाह (Remarriage) शिवधर्मानुसार विवाह (Wedding) झाला. (young boy remarried with widow girl on Vat purnima Dhule News)

मराठा समाजातील हा पुनर्विवाह घडवून आणण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी महिलांनी विशेष मेहनत घेतली. विवाह प्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. सुलभा कुवर, जिल्हाध्यक्षा नूतन पाटील, सचिव वसुमती पाटील, कापडणे शाखेच्या अध्यक्षा आशाबाई पाटील, आयस्कॉन उपाध्यक्ष व्ही. के. भदाणे, वधू-वर सूचक, सामुदायिक विवाह कक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, उपाध्यक्ष नितीन पाटील, संजय पाटील, संदीप पाटील, सचिव एस. एम. पाटील, सहसचिव संजीव पाटील, भटू पाटील, डी. एस. कुवर, प्रिया पाटील, मीना ठाकरे, चेतन पाटील आदी उपस्थित होते.

Wedding ceremony of kalpesh & sheetal
पारोळा शाळेत वही पेन देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

"शिवधर्मानुसार विवाह एक आदर्श आहे. पारंपारिक प्रथांना फाटा देवून विधवा पुनर्विवाहास चालना मिळाली पाहिजे. त्यासाठी समाजाने पारंपारिक मरगळ झटकली पाहिजे. हा एक धाडसी विवाह आहे." - नूतन पाटील, जिल्हाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड

"मराठा समाजात पुनर्विवाहाला चालना मिळाली पाहिजे. युवकांचा विवाह जमणे अडचणीचे ठरत आहे. त्यांनी आदर्श विवाहासाठी पुढे आले पाहिजे."

- आशाबाई पाटील, शाखाध्यक्ष कापडणे

"समाजातील सर्वच विवाह शिवधर्मानुसार झाले पाहिजेत. अवाजवी खर्च टाळला पाहिजे. कल्पेश आणि शीतलचा विवाह प्रेरणादायी ठरणार आहे."

- डॉ. सुलभा कुवर, प्रदेश उपाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड

Wedding ceremony of kalpesh & sheetal
Jalgaon : पाटणा परिसरातील गावठी दारूच्या हातभट्टी नष्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com