युवकाचा प्रामाणिकपणा; 24 हजाराचा मोबाईल केला परत

पोलिसांनी या तरुणाच्या प्रामाणिकपणाबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून कौतुक केले.
Police
Policeesakal

नंदुरबार : शहरातील कोकणीहील परिसरातील राहिवासी असलेल्या नीलेश गजमल साबळे या युवकास विवो कंपनीचा २४ हजार रुपये किमतीचा मोबाईल अंधारे स्टॉप येथे दोन दिवसापूर्वी (ता.२०)संध्याकाळी साडेपाचला सापडला. यावेळी त्याने प्रामाणिकपणे तो मोबाईल शहर पोलिस ठाण्यात आणून जमा केला व मोबाईल मालक यश गोसावी युवकास पोलिसांनी संपर्क साधून बोलावून सदरचा मोबाईल त्याच्या स्वाधीन केला.

यावेळी नीलेश साबळे या युवकाचा प्रामाणिकपणा बघून शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी त्याचा प्रामाणिकपणाबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून कौतुक केले. यावेळी कॉलनी परिसरातील नागरिकांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले.

Police
पांझरा कान कारखान्यातून पुढील वर्षी गाळप शक्य : उद्योजक पवन मोरे
Police
'थोडे दिवस मलाच एकनाथ समजून बैठकीत घ्या!' अभिनेता क्षितिज दाते का चिडला?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com