रामभक्तांच्या रक्ताने रंगलीय 'सपा'ची टोपी; CM योगींची जहरी टीका

योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यांच्या समाजवादी पक्षावर जहरी टीका केली आहे.
Yogi Adityanath,Akhilesh Yadav
Yogi Adityanath,Akhilesh YadavEsakal

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकांचे (Assembly Elections 2022) पडघम वाजले असून, प्रचाराच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणूक मैदानात सध्या भाजप आणि समाजवादी पक्षात (Samajwadi Party) मुख्य लढत असल्याचं पाहायला मिळतंय. दोन्ही पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली असून, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी मुझफ्फरनगर दंगलीचा मुद्दा उपस्थित करत अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या टोपीवर टीका केली आहे.

Yogi Adityanath,Akhilesh Yadav
UP मध्ये शिवसेनेचा उमेदवाराचा फॉर्म रद्द; संजय राऊत भडकले
Yogi Adityanath,Akhilesh Yadav
हरलेला पैलवान कधी चावतो तर कधी...अखिलेश यादव यांचा भाजपवर हल्लाबोल

"मुझफ्फरनगर दंगलीत 60 हून अधिक हिंदू मारले गेले आणि 1500 हून अधिक हिंदूंना तुरुंगात टाकण्यात आलं. हीच समाजवादी पक्षाची ओळख आहे. त्यांची टोपी निष्पाप रामभक्तांच्या रक्ताने रंगलेली आहे." अशी जहरी टीका केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानं पुन्हा एकदा हिंदु मुस्लीम राजकारणाला सुरूवात झाल्याचं पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये बोलत असताना त्यांनी सपावर जोरदार निशाणा साधला.

Yogi Adityanath,Akhilesh Yadav
अखिलेश यादव यांची शिवभोजन थाळीची घोषणा, युपीतही मिळणार १० रुपयात जेवण

सपाकडून गुन्हेगारांना तिकीट दिलं जातंय. त्यांचे मुरादाबादचे उमेदवार बघा. त्यांच्यापैकी एकानं म्हटलं होतं 'अफगाणिस्तानात तालिबान दिसतोय हे चांगले आहे.' तालिबान म्हणजे माणुसकीचा विरोधक तुम्ही निर्लज्जपणे त्याचं समर्थन करताय आणि सपा त्यांना तिकीट देतंय असंही पुढे योगी म्हणाले. यापूर्वी कंवर यात्रेवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता, आम्ही कंवर यात्रेवर फुलांच्या पाकळ्या वर्षाव करण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवतो. जर कोणी निष्पाप भक्तांना त्रास दिला तर त्याचं काम करून टाका असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com