मायावती, बसपाबाबत भाजपची मवाळ भूमिका; अमित शहा म्हणाले...

Amit shaha
Amit shaha Amit shaha

बहुजन समाज पक्षाने (बसप) आपली प्रासंगिकता कायम ठेवली आहे. मला खात्री आहे की त्यांना मते मिळतील. मला माहीत नाही की किती जागा मिळतील, पण बसपाला मते मिळतील. येथे मायावतींची (Mayawati) स्वतःची पकड आहे. जाटव यांचे मत बसपाला आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) म्हणाले.

उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने मायावती आणि त्यांचा पक्ष बसपा (BSP) यांच्याबाबत मवाळ भूमिका घेतल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये खरी लढत भाजप आणि सपा यांच्यात असल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या मायावतींबाबत (Mayawati) असे बोलले जात आहे की, त्या अधिक आक्रमक होऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या नाहीत.

Amit shaha
संजय राऊत म्हणाले, विदर्भात लवकरच फेरबदल; नागपुरात तळ ठोकणार

टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह (Amit Shah) म्हणाले, जाटव व्होट बँक मायावतींसोबत (Mayawati) जाईल. मुस्लिम मतही मायावतींसोबत मोठ्या प्रमाणात जातील. याचा भाजपला फायदा होईल की नुकसान होईल, हे मला माहीत नाही. ते सीटवर अवलंबून असते. परंतु, मायावती संपली हे खरे नाही. मायावतींनी या निवडणुकीत स्वत:ला लो प्रोफाईल ठेवल्याचा दावा केला जात आहे. यावर शहा म्हणाले की, याचा अर्थ त्यांचा पाठिंबा संपला असा होत नाही.

भाजपच्या मोठ्या नेत्याने मायावतींबद्दल सकारात्मक विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, खुद्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या निवडणूक रॅलींमध्ये बहुजन समाज पक्ष आणि मायावतींविरोधात अधिक आक्रमक भूमिका दाखवलेली नाही. आमचा कोणत्याही पक्षाशी करार नाही. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाप्रमाणेच बसपाही भाजपचा कट्टर प्रतिस्पर्धी आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com