esakal | नाकाने जलद टायपिंग करण्यापासून तर किडे खाणाऱ्या व्यक्तींपर्यंत भारतीयांचे १० मजेशीर विश्वविक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

10 weird world record of Indians

फक्त खेळाचे मैदानच नाहीतर अनेक क्षेत्रांमध्ये विविध विश्वविक्रमांवर भारतीयांची नावे कोरलेली पाहायला मिळतात. यापैकी काही गंमतीशीर रेकॉर्ड आहेत. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झालेली आहे. 

नाकाने जलद टायपिंग करण्यापासून तर किडे खाणाऱ्या व्यक्तींपर्यंत भारतीयांचे १० मजेशीर विश्वविक्रम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर - भारतीय म्हटले की विश्वविक्रम करण्याची आवड असतेच. फक्त खेळाचे मैदानच नाहीतर अनेक क्षेत्रांमध्ये विविध विश्वविक्रमांवर भारतीयांची नावे कोरलेली पाहायला मिळतात. यापैकी काही गंमतीशीर रेकॉर्ड आहेत. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झालेली आहे. 

सर्वात मोठा लाडू -
जगातील सर्वात मोठा लाडू बनविण्याचा विक्रम भारतीयाच्या नावावर आहे. आंध्रप्रदेशातील पीव्हीव्हीएस मल्लिकार्जुन राव यांनी हा लाडू बनवला होता. त्याचे वजन २९४६५ किलोग्रॅम होते.

सर्वात मोठी चपाती -
जगातील सर्वात मोठी चपाती बनविण्याचा विक्रम जामनगर येथील दगडूशेठ गणपती सार्वजनिक उत्सवाच्या नावावर आहे. त्यांनी १४५ किलोग्रॅमची चपाती बनविली होती.

हेही वाचा - छंद म्हणून जुळ्या बहिणी करायच्या बेकरी प्रॉडक्ट्स तयार; आयुष्याने यु-टर्न घेतल्याने...

सर्वात मोठी बिर्याणी -
२० स्वयंपाकी एकत्र येऊन त्यांनी दिल्लीत बनविलेली १४००० किलोग्रॅम बिर्याणी ही जगातली सर्वात मोठी बिर्याणी ठरली.

सर्वात लांब पगडी -
जगात सर्वात लांब पगडी परिधान करण्याचा विक्रम पंजाबमधील पटियालाच्या अवतार सिंह मौनी यांच्या नावावर आहे. त्यांची पगडी ६४५ मित्र लांब आणि जवळपास ४५ किलोग्रॅमची होती. ही पगडी घालायला त्यांना ६ तास लागायचे.

सर्वात कमी उंचीची महिला -
नागपूरची ज्योती आमगे ही जगातली सर्वात कमी उंचीची महिला असून तिची उंची केवळ २ फूट ०.६ इंच इतकी आहे.

हेही वाचा - 'चीज'वरही मिळतेय कर्ज, पण ही बँक नेमकी आहे कुठे?

सर्वात लांब मिशा -
राजस्थानच्या राम सिंह चौहान यांच्या मिशा नथ्थूलालपेक्षाही मोठ्या असून त्यांची जगातील सर्वात लांब मिशा म्हणून नोंद आहे. त्यांच्या मिशांची लांबी तब्बल १४ फूट आहे.

नाकाने सर्वात वेगवान टायपिंग -
वाचायला जरा विचित्र वाटेल. परंतु, हैदराबादच्या खुर्शीद हुसेन यांच्या नावावर नाकाने सर्वात जलदरीत्या टायपिंग करण्याचा विक्रम नोंदविला आहे. त्यांनी ४७ सेकंदात १०३ शब्द टाईप केले होते.

हेही वाचा - धानपिकाला अद्याप शिंदीचेच ‘बंध’न; प्राचीन परंपरा

सर्वात लांब नखे -
पुण्याच्या श्रीधर चिल्लाल यांची नखे जगातील सर्वात लांब नखे असून त्याची लांबी २९ फूट १० इंच होती. 

सर्वाधिक किडे खाण्याचा विक्रम -
थोडं विचित्र आहे, पण कोईमतूरच्या जॉन पीटर नाश्त्यात गांडूळ-डोसा, न्याहारीत डाळ-पतंग आणि रात्री १०-२० पाळी खातात. 

सर्वात महागडा सूट -
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१६ मध्ये परिधान केलेला सूट हा जगातील सर्वात महागडा सूट असून त्याची किंमत साडेचार कोटी रुपये होती.

संकलन व संपादन - भाग्यश्री राऊत