नागपूरचे ६ सायकलपटू देणार पर्यावरणाचा संदेश; द्वारका ते इटानगर करणार सायकलने प्रवास 

नरेंद्र चोरे 
Sunday, 17 January 2021

या अभियानात नागपूरचे सहा सायकलपटू सहभागी होणार असल्याची माहिती, क्रीडाभारतीचे विदर्भ प्रांत सदस्य संजय बाटवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नागपूर : टायगर ग्रुप ऑफ एडव्हेंचर आणि क्रीडा भारती नागपूर महानगरच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी येत्या १९ जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान द्वारका (गुजरात) ते इटानगर (अरुणाचल प्रदेश) हे साहसी सायकल अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. 

अधिक वाचा - प्रेमासमोर जन्मदात्याचा विसर! 'प्लीज पप्पा, तक्रार नका देऊ न' असं म्हणत चाकूहल्ला करणाऱ्या मुलाची घेतली बाजू

या अभियानात नागपूरचे सहा सायकलपटू सहभागी होणार असल्याची माहिती, क्रीडाभारतीचे विदर्भ प्रांत सदस्य संजय बाटवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अभियानात टायगर ग्रुपचे आयर्नमॅन रवींद्र तरारे, संदीप वैद्य, प्रसाद देशपांडे, श्रीकांत उके, नामदेव राऊत व हैदराबाद येथील विजय भास्कर रेड्डी सहभागी होणार आहेत. २६ दिवसांचे हे अभियान ३९०० किमी अंतराचे असून, एकूण सात राज्यांतून सायकलपटू प्रवास करणार आहेत. ते दररोज दीडशे ते दोनशे किमीचे अंतर पार करणार आहेत. 

जाणून घ्या - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

अभियानादरम्यान सायकलपटू ग्रीन इंडिया, क्लीन इंडिया, फिट इंडियासह वृक्षारोपण व सायकल चालविण्याचा देशवासींना संदेश देणार आहेत. अभियानाचा प्रारंभ रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक समितीपासून होणार असून, क्रीडा भारतीचे अ. भा. सहमंत्री प्रसन्न हरदास हिरवी झेंडी दाखविणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला क्रीडा भारतीचे अ. भा. कार्यकारिणी सदस्य संजय लोखंडे यांच्यासह रवींद्र तरारे, संदीप वैद्य, प्रसाद देशपांडे, श्रीकांत उके, नामदेव राऊत व विजय भास्कर रेड्डी उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 6 people in Nagpur travel Dwarka to Itanagar by cycle