esakal | तो पुन्हा येईल... पुन्हा येईल... म्हणत आला खरा; मात्र हे करून गेला...
sakal

बोलून बातमी शोधा

After a red alert in Nagpur light rain fell

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटांमुळे जोरदार वादळी पाऊस बरसण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली होती. विशेषत: नागपूर, अकोला, वर्धा, अमरावती, बुलडाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस येणार असल्याचा अंदाज व्यक्‍त केला होता.

तो पुन्हा येईल... पुन्हा येईल... म्हणत आला खरा; मात्र हे करून गेला...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेला वादळी पावसाचा इशारा अपेक्षेप्रमाणे फोल ठरला. दिवसभर उन्हाचे चटके बसल्यानंतर सायंकाळी वादळ आले. परंतु, काही भागांत हलका शिडकावा करून शांत झाले. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला. तसेच थोड का होईना उकाळ्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. 

मध्य भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान विभागाने विदर्भात शनिवारी व रविवारी "रेड' व "ऑरेंज अलर्ट'चा इशारा देत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. गारपिटीचाही इशारा देण्यात आला होता. मात्र, "अलर्ट'नंतरही विदर्भात पावसाचा थेंबही पडला नाही. उलट दोन्ही दिवस उन्हाचे तीव्र चटके जाणवले. रविवारी सायंकाळी वादळ आले. परंतु, जोरदार पाऊस आलाच नाही. नावापुरता काही भागांत पावसाचा शिडकावा झाला. इशारा संपल्याने आता स्थिती "नॉर्मल' होऊन हलकी थंडी जाणवायला लागेल.

अवश्य वाचा - वडिलांची प्रकृती खराब झाली अन्‌ रुग्णालयातील महिलेशे जुळले सुत, मग केले हे...

पुढील 48 तास विदर्भातील शेतकऱ्यांसाठी मोठे संकट घेऊन येण्याची दाट शक्‍यता असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले होते. काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचाही इशाराही देण्यात आला होता. पावसाच्या शक्‍यतेमुळे वैदर्भींना उन्हाच्या चटक्‍यांपासून थोडाफार दिलासा मिळणार असला तरी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही, अशीच स्थिती होती. मात्र, तसे काहीही झाले नाही. 

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटांमुळे जोरदार वादळी पाऊस बरसण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली होती. विशेषत: नागपूर, अकोला, वर्धा, अमरावती, बुलडाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस येणार असल्याचा अंदाज व्यक्‍त केला होता. भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांनाही वादळाचा तडाखा बसण्याची शक्‍यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली होती.

हेही वाचा - शेतात गेलेल्या पत्नीला पती काही दिसले नाही... ते घरी गेल्याचे समजून करीत होत्या काम, मात्र...

अजून भरपूर काही बघायच?

सतत येत असलेल्या पावसाने सोशन मीडियावर अनेक जोक्‍स फिरत होते. दिवाळी पाहून जातो, मतदान करून जातो, महाराष्ट्रात कोणता पक्ष सत्ता स्थापण करणार, कोण मुख्यमंत्री होणार? यांना जोडून पावसाची खिल्ली केली जात होती. आता अजून भरपूर काही बघायच आहे, असेच जणू पावसाला म्हणायचे आहे की काय?