परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांसाठी ‘देव’ झाले फडणवीस; गृहमंत्री अमित शहांनी दिला प्रतिसाद

Amit Shah fulfilled Devendra Fadnavis' demand for student welfare
Amit Shah fulfilled Devendra Fadnavis' demand for student welfare

नागपूर : परीक्षेच्या प्रवेशपत्रालाच रेल्वेचा पास समजून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधा पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना केली होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ रेल्वे मंत्रालयाला तशा सूचना दिल्या. त्यामुळे नीट-जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

फडणवीस यांनी कालच आपल्या मागणीचे पत्र अमित शहा यांना ट्विट केले. त्यांच्या ट्विटला गृहमंत्र्यांनी तत्काळ प्रतिसाद दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार देशात नीट-जेईई परीक्षा होऊ घातली आहे. लॉकडाऊन सुरू असल्यामुळे मुंबईच्या लोकल रेल्वेत केवळ अत्यावश्‍यक कामांसाठीच प्रवासाची परवानगी दिली आहे.

त्यामुळे विद्यार्थी परीक्षेसाठी आवागमन करू शकतील. परंतु, हा प्रवास करताना त्यांना इतर कुठलीही अडचण जाऊ नये, म्हणून विद्यार्थांच्या प्रवेश पत्रालाच रेल्वेचा पास समजून त्यांना प्रवास करण्याची परवानगी द्यावी. रेल्वे मंत्रालयाला तसे आदेश निर्गमित करणे गरजेचे आहे, असे फडणवीसांनी पत्रात नमूद केले होते.

आपली विद्यार्थहिताची मागणी तत्काळ पूर्ण केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहे आणि योग्य वेळी योग्य सूविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थांनी फडणवीसांचे आभार मानले आहे.

देशभरात नीट-जेईई परीक्षेला सुरुवात झाली असून, मुंबई महापालिकेच्या उपनगरी सेवांमध्ये योग्य ती वाढ करावी आणि संभाव्य उमेदवारांना या परीक्षेला बसण्यासाठी प्रवेशपत्रांच्या आधारे प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी. त्यानुसार १ सप्टेंबर २०२० पासून मुंबई आणि मुंबई उपनगरी सेवा योग्यरित्या वाढविण्यासाठी मध्यवर्ती व पश्चिम रेल्वेने कार्यवाही करावी, अशा सूचना केंद्रातून देण्यात आल्या आहेत.

वाहतूक व्यवस्था अद्यापही पूर्णपणे सुरू झालेली नाही

देशात नीट आणि जेईई परीक्षा होऊ घातली आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही पूर्णपणे सुरू झालेली नाही. अशा परिस्थितीत नीट-जेईई परीक्षा देणार असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांचा उत्साह वाढावा, यासाठी त्यांच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रालाच रेल्वेचा पास समजून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधा पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना केली होती. त्यांनी तत्काळ ही मागणी पूर्ण केली.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com