ब्रेकिंग नागपूर जिल्हा: परवानगी न घेता परस्पर बिहार राज्यातून मजूर आणले महाराष्ट्रात; नंतर काय घडले टाकळघाटात....

file
file

हिंगणा (जि.नागपूर) : टाकळघाट एमआयडीसीतील इंडोरामा कंपनीमध्ये जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेता बिहारमधून कंत्राटी कामगार परस्पर आणण्यात आले. यातील एक कामगार कोरोना पॉझिटिव्ह होता. त्यानंतर लेबर कॉन्ट्रॅक्‍टरने या रुग्णाला नागपुरातील मेडिकल कॉलेज परिसरात आणून सोडले. याची माहिती मिळताच तालुका आरोग्य विभागाची चमू सर्च मोहिमेसाठी निघाली. तब्बल तीन तासांनंतर रुग्ण भटकंती करीत असताना दिसून आला. कंपनी व्यवस्थापनाच्या अशा भूमिकेमुळे प्रशासनाची तारांबळ उडत आहे.

अधिक वाचा : पब्जीच्या वेडातून नैराश्‍य वाढल्याने युवतीने घेतला "हा' चुकीचा निर्णय...

अधिकृत माहिती नाही
हिंगणा तालुक्‍यात टाकळघाट औद्योगिक क्षेत्र आहे. याठिकाणी इंडोरामा कंपनी असून शेकडो कामगारकार्यरत आहेत. टाकळघाटात दोन दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
जिल्हा प्रशासनाने औद्योगिक कंपन्यांना परवानगी दिली. यानंतर उद्योग व्यवस्थापनाने सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवून काम सुरू केले आहे. इंडोरामा कंपनीतील एका ठेकेदाराने परस्पर गाडी पाठवून बिहार मधील छपरा येथून 11मजूर कामासाठी बोलावले. मजूर टाकळघाटात आल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाकडे नोंद करणे गरजेचे होते. त्या मजुरांचे मेडिकल तपासणी करणे गरजेचे होती. त्यांची आरोग्य तपासणी कुठे झाली, याची अधिकृत माहिती नाही. या कामगारांना कंपनीतच ठेवण्यात आले. यातील एक कामगार कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती 11जुलै रोजी तालुका आरोग्य विभागाला लागली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पडवे पथकासह कंपनी परिसरात दाखल झाले. कंपनीतील व्यवस्थापकाने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सौजन्यपूर्ण वागणूक दिली नाही. प्रशासनाला

कुठलेही सहकार्य न करता
कोरोना पॉझिटिव्ह कामगाराला परस्पर गाडीत बसवून नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. या रुग्णाकडे कुठलेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने मेडिकलमध्ये त्याला दाखल होता आले नाही. हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मेडिकल परिसरात बिनधास्तपणे फिरत होता. याची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्‍टर पडवे पथकासह मेडिकल परिसरात दाखल झाले.

तब्बल तीन तास रूग्णांचा पत्ता नाही
तब्बल तीन तास शोध मोहीम घेतल्यानंतर रूग्ण त्यांच्या हाती लागला. यानंतर या रुग्णाला तालुका आरोग्य विभागाने मेडिकलमध्ये दाखल केले. यानंतर तालुका आरोग्य विभागाने सुटकेचा निश्वास सोडला. बिहारमधून परस्पर मजूर आणणाऱ्या ठेकेदारावर जिल्हा प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे. उद्योगांमध्ये असेच प्रकार सुरू राहिल्यास टाकळघाट परिसरही कोरोनाचा "हॉटस्पॉट' भविष्यात होऊ शकतो,अशी भीती व्यक्त केली जात आहे. उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, एमआयडीसी प्रशासनातील अधिकारी व इंडोरामा व्यवस्थापना सोबत बैठक घेऊन तातडीने हा विषय निकाली काढणे गरजेचे आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

कामगार परस्पर आले कसे ?
इंडोरमा कंपनीत कामासाठी एका ठेकेदाराने बिहारमधील छपरा येथून 11 कामगार परस्पर वाहनातून आणले. वाहनाचा ई-पासही काढला नाही. जिल्हा प्रशासनाची परवानगी घेतली नाही. कामगाराची वैद्यकीय तपासणीही झाली नाही. यातील एक कामगार कोरोना पॉझिटिव्ह निघाला. तालुका आरोग्य प्रशासनाने याची दखल घेतली नसती तर कंपनीतील सर्व कामगारांना कोरोनाची लागण झाली असती. अशा घटना टाळण्यासाठी कंपनी व्यवस्थापनावर कडक निर्बंध लादणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यासाठी पुढाकार घेणार काय, हा प्रश्न आता विचारला जात आहे.

संपादन : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com