फुलपाखरे इवली इवली, निळ्या मखमली अंगावरती, विद्यापीठ परिसरात गवसला निसर्ग खजिना!

butterflies found in rtm nagpur university amravati road campus
butterflies found in rtm nagpur university amravati road campus

नागपूर : उन जसे जसे वाढायला लागले की कुणीतरी मुठभर हळद हवेत उधळावी तसे फुलपाखरांचे थवे इकडून तिकडे भिरभरतात. चपळ, चंचल, नाजूक आणि भित्री फुलपाखरे म्हणजे निसर्गाचा अभूतपूर्व अविष्कार होय. कित्येक कवीवर्य या इवल्याशा जिवासाठी वेडे झाले. फुलपाखरांची ही बाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात साकारली आहे. 

फुलपाखरे, पक्षी अन् प्राण्यांचा वावर असलेला परिसर म्हणजे समृद्ध असा निसर्ग खजिनाच होय. हा खजिना विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील निसर्गरम्य परिसरात गवसला आहे. विद्यापीठाने केलेल्या 'ग्रीन ऑडिट'मध्ये विद्यापीठ परिसरात फुलपाखरे, पक्षी अन प्राण्यांचा वास असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यापीठाद्वारे यावर्षी 'नॅक'ला सेल्फ स्टडी रिपोर्ट पाठविण्यात आला. मात्र, तो पाठवित असताना, विद्यापीठाला नॅकद्वारे त्यांचे 'ग्रीन ऑडिट' करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यापीठाद्वारे 'ग्रीन ऑडिट' करण्यासाठी डॉ. प्रीती त्रिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली भूगर्भशास्त्र , वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्र विभागाचे डॉ. दीपक बारसागडे, डॉ. प्रकाश इटनकर, डॉ. नितीन डोंगरवार, डॉ. अभय वऱ्हाडे, विद्यार्थी आशिष टिपले यांचा समावेश असलेली समिती तयार करण्यात आली.

या समितीने प्रथम विद्यापीठाचा कॅम्पसचा वेध घेत, तपासणी केली. विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील विद्यापीठ परिसर एकीकडून निसर्गनिर्मित जंगल आणि एकीकडे अंबाझरी तलावाचा भाग आहे. त्यामुळे या परिसरात पाण्याची समस्या मोठी आहे. त्यातूनच परिसरात कमी पाण्यावर जगणाऱ्या झाडाची संख्या मोठी असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. याशिवाय परिसरात फुलांची विविध झाडे असल्याने विविध फुलपाखरू व विविध प्रजातींचे पक्षी बघायला मिळतात. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात मधमाशीचे पोळे असल्याचे आढळून आले. त्यातच या परिसरात सापांच्या विविध प्रजाती असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे परिसराला लागून असलेल्या जंगलात रानडुक्करासह ससे आणि इतर प्राणीही दिसत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. हे सर्व नैसगिक असल्याने ते टिकवून ठेवण्यासाठी समितीने काही सूचनाही दिल्यात. विद्यापीठाने प्रथमच असे ऑडिट केल्याने त्यातून विद्यापीठातील जैवविविधतेची माहिती समोर आली हे विशेष. 

अशा आहेत समितीच्या सूचना -

  • परिसरात पाण्याची समस्या असल्याने ते जतन करण्यासाठी प्रयत्न करणे 
  • परिसरात फुलांची अधिकाधिक झाडे लावणे, जेणेकरून कीटकांचा प्रसार वाढून त्यामुळे फुलपाखरे आणि पक्षी येण्यास मदत होईल. 
  • विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात पर्यावरणासंदर्भात विषयाचा समावेश करणे 
  • विद्यार्थी व प्राध्यापकांचा सहभाग वाढविणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com