हिमाचलसह उत्तर भारतात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे विदर्भात पुन्हा शीतलहर आली आहे. नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऱ्यात लक्षणीय घट झाली आहे. हवेतील गारठा आणखी दोन-तीन दिवस कायम राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
नागपूर : डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात नागपूरसह संपूर्ण विदर्भात थंडीची लाट पसरली होती. त्यानंतर अचानक ढगाळ वातावरणामुळे थंडी काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र ऐन संक्रांतीच्या कालावधीत पुन्हा विदर्भात शीतलहर आली आहे.
जाणून घ्या - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली
हिमाचलसह उत्तर भारतात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे विदर्भात पुन्हा शीतलहर आली आहे. नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऱ्यात लक्षणीय घट झाली आहे. हवेतील गारठा आणखी दोन-तीन दिवस कायम राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
ढगाळ वातावरणामुळे गेल्या आठवड्यात २० अंशांवर गेलेल्या पाऱ्यात आज अचानक घसरण झाली. चोवीस तासांत किमान तापमान तीन अंशांनी घसरून १५ अंशांवर आले. तर गोंदिया जिल्ह्यात पारा साडेपाच अंशांनी खाली आला. येथे बुधवारी नोंद झालेले ११ अंश सेल्सिअस तापमान विदर्भात सर्वात कमी ठरले.
नक्की वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं
विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये पाऱ्यात एक ते चार अंशांची घसरण झाल्याचे दिसून आले. तिळसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. दरवर्षीच्या तुलनेत विदर्भात यंदा थंडीचे उशिरा आगमन झाले आहे. गेल्या २१ डिसेंबरला नागपूरचा पारा नीचांकी ८.४ अंशांपर्यंत घसरला होता.
संपादन - अथर्व महांकाळ