माणुसकी संपलेली नाही : कोरोनाबाघित गर्भवती लिफ्टमध्ये अन् बाळाचे डोकं बाहेर आले; जवळ कुणीही नाही, पुढे...

Corona positive patient delivery in medical hospital lift
Corona positive patient delivery in medical hospital lift

नागपूर : दिवस शुक्रवार... वेळ सकाळी साडेअकराची... प्रसूती वेदना असह्य झाल्याने सुनीता वाघमारे हिला प्रसूतीसाठी नेत होते... तिला लिफ्टमध्ये टाकले... मात्र, लिफ्टमध्ये नेट असतानाच बाळाचे डोकं बाहेर आले... कुणीही मदतीला नव्हते... काय करावे आणि काय नाही काही समजे ना... अशात एक परिचारिका धावत आली... तिने मातेची प्रसूती केली... मानवता सेवेचा वटवृक्ष आजही जिवंत असल्याचे या परिचारिकेने दाखवून दिले. प्रसूत माता कोरोनाबाधित आहे, हे विशेष...

लिफ्टमध्ये असलेल्या मातेच्या बाळाचे डोक बाहेर निघाले होते. मदतीसाठी कुणीही नसल्याने माता किंचाळत होती. यावेळी सुजाता या परिचारिका जात होत्या. त्यांना मतेच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन बघितले असता बाळाचे डोक बाहेर आलेले दिसले.

त्यांनी लगेच याची माहिती निवासी डॉक्टरांना दिली व लिफ्टजवळ येण्याची विनंती केली. मात्र, त्यांचा बोलावण्याचा प्रयत्न व्यर्थ ठरला. अखेर करुणेची किनार असलेली परिचारिका व्यवसायातील सुजाता नावाची माय धावून आली. मानवता सेवेचा वटवृक्ष आजही जिवंत असल्याचे या सिस्टरने दाखवून दिले.

बाहेर निघत असलेले बाळ अलगद हातावर घेतले. बाळ सिस्टरच्या हातावरच रडले. नंतर कोरोनाबाधितांच्या महिला वॉर्डातील विशेष कक्षात दाखल करण्यात आले. त्या महिलेची बाळाची प्रकृती बरी आहे. जिवाची पर्वा न करता कोरोनाबाधित मातेला मदत करण्यासाठी पुढे आलेल्या सुजाता सिस्टरचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी फोन करून कौतुक केले आहे.

समाजापुढे ठेवला नवीन आदर्श

कोविड-19च्या संकटाने नातेवाईक एकमेकांच्या जवळ येत नाही आहे. डॉक्टरही दुरूनच उपचार करीत आहे. अशा बिकट अवस्थेत नागपूरच्या मेडिकलमध्ये एका कोरोनाबाधित गर्भवतीची प्रसूतीची वेळ आली. बाळाचे डोकं बाहेर निघाले होते. डॉक्टरांना सांगितले तर ओटीत आणा असा सल्ला देण्यात आला. याप्रसंगी जिवाची पर्वा न करता, पीपीई किट नसतानाही ती पुढे सरसावली आणि मातेची प्रसूती केली. कोरोनाचा विषाणू दंश करेल हे माहीत असतानाही हे धैर्य व सेवाधर्म निभावणारी सुजाता सिस्टरने समाजापुढे नवीन आदर्श ठेवला आहे.

प्रसूत मातेने जोडले हात

नऊ महिने पोटात वाढवलेल्या काळजाचा तुकडा वाचवणाऱ्या सुजाता सिस्टरला हात जोडून मातेने आभार मानले. त्यावेळी सुजाताचेही डोळे पाणावले. बाधित महिलेची प्रसूती करणाऱ्या सुजाताला विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com