ग्रामीण भागात फुटला "पॉझिटिव्ह' रूग्ण संख्येचा बांध, काटोलात 9 बालकेही क्‍वारंटाइन...

KAMATHI
KAMATHI

ब्रेकिंग नागपूर ग्रामीण  :  कोरोनाबाधीतांच्या संख्येचा बांध फुटला असून गुरूवारी हिंगण्याची कामगारबहुल वस्ती असलेल्या अमरनगरात पुन्हा 14 पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाल्याने ग्रामीण प्रशासनाची धावपळ उडाली. कामठीत एक तर काटोलात एका बालकाला संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. श्रमीकनगर 7 तर दवलामेटीत 3 रूग्णांची भर पडली. सावनेरात एक विज वितरण कंपनीत काम करणारी व्यक्‍ती "पॉझिटिव्ह' निघाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

आठ वर्षांचे बालक "पॉझिटिव्ह'
काटोल :8 वर्षीय बालकासह माय-लेक पॉझिटिव्ह निघाल्याने त्या बालकासोबत खेळणारी आठ ते नऊ बालके व त्यांच्या कुटुंबांना नागपूर वनामती, आमदार निवास व इतर ठिकाणी हलविले. काटोल ग्रामीण रुग्णालयाने धडक मोहीम राबवून 39 संशयितांना नागपूरला पाठविले. यात 9 बालकांचा समावेश असल्याचे डॉ. सुधीर वाघमारे यांनी सांगितले. या केसचे "कनेक्‍शन' रिधोरा असून, तेथील परिस्थिती सध्या आटोक्‍यात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी शशांक व्यवहारे यांनी सांगितले. रिधोरा येथील यापूर्वी 108 व्यक्तींना नागपूरला विलगीकरण कक्षात हलविले आहे. पारडसिंगा येथे गुरवारी 16 व्यक्ती केअर सेंटरला पाठविल्याची एकूण 55 रुग्ण पारडसिंगा येथे उपचार घेत आहेत. रिधोरा येथे यापूर्वी चार 4 रुग्ण पॉझिटिव्ह तर काटोल येथे अन्य दोन तसेच गुरुवारला मायलेक मिळाल्याने एकूण "पॉझिटिव्ह' रुग्णसंख्या आठवर पोहोचली आहे.

अमरनगरातील रूग्णसंख्या 63
हिंगणा एमआयडीसी  :  गुरुवारी नीलडोह ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या अमरनगरातील 8 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आधी या परिसरात21 रुग्णसंख्या होती. पॉझिटिव्ह आलेले सर्व आठही एकाच गल्लीतील राहणारे आहेत. यात बालकांचाही समावेश आहे. या सर्वांना आधीच क्‍वारंटाइन करण्यात आले होते. 8 जणांचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला. तालुक्‍यातील रुग्णसंख्या 63 वर पोहोचली आहे.

आईच्या भेटीला आलेला पाहुणा निघाला पॉझिटिव्ह
भिवापूर : हिंगणा मार्गावरील अमरनगर भागात राहणारा व्यक्ती गत आठवड्यात तालुक्‍यातील मांगली (जगताप) येथे आईला भेटायला आला. एक दिवसाचा मुक्काम ठोकून दुसऱ्या दिवशी परत गेला. या व्यक्तीच्या कोरोना चाचणीचा निकाल आज पॉझिटिव्ह आल्याने मांगली येथे खळबळ उडाली. ही व्यक्ती ज्यांच्या संपर्कात आली, त्या सर्वांना आज क्वारंटाइन करण्यात आले."हायरिस्क' संशयित असलेल्या 19 जणांपैकी काहींना मांगली येथील सरकारी शाळेत तर काहींना होमक्‍वारंटाइन करण्यात आले. ही व्यक्ती भिवापूरलासुद्धा आली होती. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेले फळ, भाजीपाला, चहाविक्रेत्यांसोबत पेट्रोल पंपावरील एकास क्‍वारंटाइन करण्यात आले असल्याचे समजते.  मूळ मांगलीचा असलेला हा इसम हिंगणा एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत कामाला असून अमरनगर परिसरात त्याचे वास्तव्य आहे. हा व्यक्ती ज्या कंपनीत कामाला आहे, तेथील दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने कंपनीतील इतर सर्वांना क्‍वारंटाइन करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्या दोघांपैकी एक जण अमरनगरात वरील व्यक्‍तीच्या शेजारी राहत असल्याचे समजते. होमक्वारंटाइन असतानासुद्धा हा व्यक्ती मांगली येथे येऊन गेला. त्याच्या कोरोना चाचणीचा आज पॉझिटिव्ह असल्याने मांगली येथील ग्रामस्थांची चिंता बळावली आहे. विशेष म्हणजे अमरनगरमध्ये राहणाऱ्या मुलीचा टेस्ट रिपोर्टसुद्धा यापूर्वीच पॉझिटिव्ह आलेला होता. एकाच घरातील वडील व मुलगी दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याने कुटुंबातील इतरांना क्‍वारंटाइन करून त्यांच्या टेस्ट केल्या जात आहेत.

10 बाधित रुग्णांची कोरोनावर मात
कामठी : तालुक्‍यातील महादुला नगरपंचायत हद्दीतील बजरंगनगर येथे पुन्हा एका 36 वर्षीय युवकाला
कोरोनाची लागण झाली असल्याचे गुरुवारी आलेल्या अहवालात निष्पन्न झाले. पॉझिटिव्ह अहवाल आलेला हा युवक सावनेर येथे महावितरण कंपनीत नोकरीला होता. तालुका प्रशासनाने या रुग्णाच्या  संपर्कात आलेल्या त्याच्या परिवारातील सात सदस्यांसह एकूण 13 लोकांना क्‍वारंटाइन केले. हा रुग्ण राहत असलेला परिसर सील करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com