कोरोनाबाधित मृतदेहाच्या अवयवांची होतेय तस्करी! उच्च न्यायालयात मध्यस्थी अर्ज, केली ही मागणी

Dead corona patient organs are sold
Dead corona patient organs are sold

नागपूर : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नागपुरातही रोज दोनअंकी आकड्यात रुग्णांचा मृत्यू होत आहे. तसेच हजारावर बाधित आढळून येत आहेत. यामुळे नागपूरकरांच्या मनात चांगलीच भीती निर्माण झाली आहे. नातेवाईकांचे मृतदेहही अंत्यसंस्कारासाठी मिळत नसल्याचे दुःख मनात असताना नवीनच माहिती पुढे आली आहे. चक्‍क अवयव तस्करीची शंका व्यक्त करण्यात येत असल्याने उच्च न्यायालयात मध्यस्थी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

उपराजधानीत कोरोनाबळींची संख्या चांगलीच वाढली आहे. सर्वत्र भयाण परिस्थिती असतानाच वेगवेगळ्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. कोरोना रुग्णांच्या शरीरातील अवयव काढून त्यांची तस्करी केली जात असल्याची चर्चा सोशल मीडियावरून पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अवयव तस्करीची शंका दूर व्हावी यादृष्टीने मृतदेहांसाठी पारदर्शी किट वापरा, अशा आशयाची विनंती करणारा मध्यस्थी अर्ज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आला आहे.

कोरोना रुग्णांवर उपचारासंदर्भातील दुरव्यवस्थेबाबत उच्च न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. याच प्रकरणात आमचेही म्हणणे ऐकून घेतले जावे, या विनंतीसह समाजसेवक अंजू छाबरानी यांच्यासह ७ जणांनी ॲड. एम. अनिलकुमार यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे. कोरोना रुग्णावर उपचाराच्या सुविधा अधिक चांगल्या होत्याच्या दृष्टने त्यांनी सूचनाही दिल्या आहेत.

कोरोनाबाधिताचा मृतदेह तातडीने वेगळा करून शवविच्छेदनगृहात ठेवण्यात यावा. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेला जात असताना नातेवाइकांच्या मनात कोणतीही शंका येऊ नये यासाठी पारदर्शक किटमध्ये मृतहेह गुंडाळण्यात यावा. याशिवाय गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध व्हावे

यासाठी मध्यवर्ती ऑनलाइन प्रक्रिया विकसित करावी. कोविडमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा लावावी. त्यामुळे बाहेर नातेवाइकांना उपचारांबाबत व रुग्णांच्या स्थितीबात कळू शकेल. खासगी रुग्णावाहिकेचे दर निश्चित करावे, आदी सूचना करण्यात आल्या आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com