एमआयडीसी परिसर पडला ओस; आता दिसतात फक्‍त "त्यांच्या' आठवणींच्या खुणा

एमआयडीसी  : कामगार स्वगृही परतल्याने ओस पडलेला एमआयडीसी परिसर.
एमआयडीसी : कामगार स्वगृही परतल्याने ओस पडलेला एमआयडीसी परिसर.

हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर)  : परप्रांतातून, खेड्यापाड्यातून एमआयडीसीत आणलेल्या मजूरांना ठेकेदारांनी ऐन लॉकडाउन काळात वाऱ्यावर सोडले. पैशासाठी मौताद झालेल्या मजुरांना पायदळ गावाकडे परतावे लागले. या दिशाहीन अंसघटित कस्टकऱ्यांची दैना पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांच्या निघून जाण्याने आता एमआयडीसी परिसर ओस पडला. येत्या महिनोगणती अशीच परिस्थिती कायम राहणार असल्याने उद्योगाची स्थिती मात्र गोत्यात येण्याची शक्‍यता आहे.

कामगारांचा तुटवडा जाणवणार
शहरातील टोलेजंग इमारती, चिकनेचोपडे सिमेंट रस्ते, आकाशाकडे पाहायला लावणारी मेट्रोची पटरी, हे सर्व शहराच्या सौंदर्यात भर पाडणारे दृश्‍य आज पाहायला मिळते ते असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरामुळे. शहराच्या नावाने गावखेड्यातून मोठे स्वप्न दाखवीत घामाची दलाली करणाऱ्या या ठेकेदारांनी कस्टकऱ्यांना मोठे स्वप्न दाखवून शहरात आणले. त्याच्याकडून रात्रंदिवस कामे करून घेतली. बिल्डर लॉबर आणि ठेकेदारांनी मोठी माया कमविली. पण, एकदम लॉकडाउन झाल्यावर काम बंद झाले. दिवसामागे दिवस निघत गेले; पण या कामगारांच्या ठिय्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. पैसे नसल्याने विचार करीत बसण्यापेक्षा पायदळच शहरातून त्यांनी जाणे पसंत केले.

महिनोगणती राहणार हीच स्थिती
हिंगणा एमआयडीसी हा औद्योगिक परिसर म्हणून ओळखला जातो. मिहान परिसरात एकापेक्षा एक सरस मोठ्या टोलेजंग इमारती आहेत. या बांधकामावर असलेल्या मजुरांसाठी ठेकेदारांनी राहण्यासाठी अस्थायी झोपड्या बांधून दिल्या. काहींनी गावात किरायाचे घर घेतले. एकत्र सामूहिक संयुक्त कुटुंब राहत होते. पण, लॉकडाउन होताच एकदम एका झटक्‍यात काम बंद झाले. कुणीच कुणाला भेटू शकले नाही. ठेकेदाराने येणे बंद केले. या कामगारांकडे असलेली पुंजी संपली. घरातील अन्नधान्य संपले. जेवणाच्या रांगेत उभे झाले. तिथेही हताश झाल्यावर गावाचा एकच पर्याय असल्याने त्यांनी शहर सोडले. रोजगाराचे स्वप्न बघताना त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. आता हा परिसर ओसाड पडला आहे. आजूबाजूच्या गावातील अर्धा गाव खाली झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आता सर्वच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांची कमतरता भासणार आहे. कस्टकरी दिशाहीन कामगाराची दैना सरकारने समजून जे या संकटात तग धरून थांबून आहेत, त्यांना दिलासा देऊन, ठेकेदाराचे अधिकार काढून मालकांना जबाबदारी घेऊन नियमांचे पालन करणे गरजेचे झाले आहे. अनेक महिने या क्षेत्राला कामगारांपासून आता मुकावे लागणार, हे मात्र तेवढेच सत्य आहे.

गुलामीची वागणूक दिली जाणार नाही
मजूर परराज्यातून महाराष्ट्रात येतो. त्याचा कुठे काम करणार याचा पुरावा असावा. त्यात ठेकेदार कोण, किती वर्षांसाठी थांबणार, वेळ संपताच तो सुखरूप गावाकडे परतणार, या गोष्टींचा अंतर्भाव करारनाम्यात असावा. तो "डेटा' संबंधित विभागाकडे राहील. त्यामुळे त्याला गुलामीची वागणूक दिली जाणार नाही.
-विनोद कडू
कस्टकरी श्रमिक सेना
जिल्हाध्यक्ष, नीलडोह

हजारो हात आले सेवेसाठी पुढे
लॉकडाउनमध्ये सर्वांत जास्त हातावर आणून पानावर खाणाऱ्या असंघटित कामगारांची उपाशीपोटी गैरसोय झाली. शासनाची मदत मिळाली; पण तोकडीच ठरली. त्यामुळे हजारो सामाजिक हात सेवेसाठी समोर आले. लॉकडाउन झाल्यापासून लल्लूसाई सेवाभावी ट्रस्टचे अनेक सहकारी एकत्र येऊन आम्ही या कामगारांना उपाशी पोटी न ठेवण्याचा प्रयत्न केला.
-अनिल चानपूरकर
अध्यक्ष,
श्री लल्लूसाई सेवाभावी ट्रस्ट, हिंगणा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com