The distance between husband and wife came
The distance between husband and wife came

धक्‍कादायक! लॉकडाउनमुळे पती-पत्नीच्या अफेअरचे तब्बल इतके प्रकरण आले उघडकीस

नागपूर : कोरोनामुळे देशात लॉकडाउन व संचारबंदी करण्यात आली. त्यामुळे अनिवार्य विभागातील शासकीय कर्मचारी वगळता सर्वांना घरात बसून राहावे लागत होते. मात्र, यादरम्यान पती-पत्नीतील वाद चव्हाट्यावर आले आहेत. लॉकडाउनदरम्यान अनेकांची "अफेअर' बाहेर आलेत. सध्या शहरातील भरोसा सेलमध्ये कौटुंबिक वादाच्या जवळपास 1,300 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये 27 तक्रारी पती-पत्नीच्या अफेअरबाबत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपासून कौटुंबिक हिंसाचार आणि पती-पत्नीमधील वादविवाद चव्हाट्यावर येत आहे. अशी अनेक प्रकरणे थेट पोलिस ठाणा ते भरोसा सेलमध्ये जात आहेत. लॉकडाउनदरम्यान पती आणि पत्नी चोवीस तास एकमेकांना वेळ देत होते. त्यामुळे पती आणि पत्नीने एकमेकांना समजून-उमजून घेतले. एकमेकांप्रती आदर, प्रेम, आपुलकी वाढून भावनिक नाते घट्ट होईल, अशी अपेक्षा होती. कुटुंबातील व्यक्‍ती एकमेकांना वेळ देत असल्यामुळे संयुक्‍त कुटुंबाची संकल्पना आणखी दृढ होईल, अशी आशा होती. परंतु, असे न होता याउलट झाले.

पती-पत्नींचा एकमेकांप्रती प्रेमभावना वाढण्याऐवजी उणे-दुणे काढण्यात वेळ गेला. एकमेकांची खानदान आणि मानपान यावरून वाद वाढले. काही ठिकाणी पतीचे बाहेर असलेले अफेअर उघडकीस आले तर कधी पत्नीचे पहिल्या प्रेमाप्रती असलेला ओलावा पतीला जाणवला. लॉकडाएन संपताच अनेकांनी थेट पोलिस ठाणे किंवा भरोसा सेलमध्ये धाव घेतली. मोठमोठ्या तक्रारी लिहून एकमेकांपासून घटस्फोटापर्यंत प्रकरणे पोहोचली.

प्रकरण 1 
शांतीनगरात राहणारी  सोनाली  आणि गोविंद (बदललेले नाव) यांचा 2016 मध्ये प्रेमविवाह झाला. सोनालीची मैत्रीण सुनिता ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी सोनालीकडे येत होती. दरम्यान तिची गोविंदवर नजर गेली. दोघांमध्ये अफेअर सुरू झाले. पैशासाठी हपापलेली सुनिता गोविंदच्या बाईकवर बसून फिरायला लागली. त्याचे पैसे उडवायला लागली. लॉकडाएनदरम्यान त्यांच्या अफेअरची माहिती सोनालीला मिळाली. लॉकडाएन असतानासुद्धा पती आणि सुनिता सोबत फिरत असल्याचे लक्षात आले. तसेच सुनिताच्या आईलाही गोविंद गिफ्ट द्यायला लागला. त्यामुळे सुनिताचे घर गोविंदसाठी अय्याशीचा अड्डा बनला. अफेअरची कुणकुण बायकोला लागल्यामुळे गोविंद मारहाण करायला लागला. त्यामुळे सोनालीने भरोसा सेलच्या प्रमुख शुभदा संखे यांच्याकडे तक्रार केली.

अधिक माहितीसाठी - Video : फार्महाऊसवर सहा जणांनी पतीसमोर केला पत्नीवर बलात्कार
प्रकरण 2 
संजना (बदललेले नाव) हिचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. पती शासकीय सेवेत असून, स्वभावाने अगदी भोळा. पती ऑफिसला गेल्यावर संजनाचे लग्नापूर्वीचा प्रियकर घरी येत होता. त्याच्यासोबत फोनवरून नेहमी बोलणे आणि वॉट्‌सऍपवरून चॅटिंग सुरू होते. लॉकडाउनमुळे हा प्रकार बंद झाला. त्यामुळे संजना अस्वस्थ झाली. दोघांच्या भेटी बंद आणि पती चोवीस तास घरात असल्यामुळे फोनवरही बोलणे बंद. बेचैनी वाढत गेली. विरह सहन न झाल्यामुळे दोघांचे चोरून लपून चॅटिंग आणि फोन सुरू झाले. एकदा रात्री दोन वाजताच्या सुमारास पत्नी गॅलरीतून प्रियकराशी बोलत होती. गाढ झोपेत असलेल्या पतीला जाग आली. पत्नी बेडवर नसल्याचे बघून त्याला काळजी वाटली. त्याला दरवाजाही उघडा दिसला. त्याने लगेच गॅलरीत धाव घेतली. तर संजना फोनवर बोलताना दिसली. तिला विचारणा केली असता सांगायला तयार नव्हती. शेवटी कॉलबॅक केल्यानंतर तसेच कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर पतीच्या पायाखालची जमीन सरकली. हे प्रकरण तिच्या माहेरपर्यंत आणि नंतर पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले.

काय सांगतात तज्ञ 
आठ ते दहा तासा घराबाहेर राहणारा जोडीदार लॉकडाएनमुळे चोवीस तास घरात राहत होता. त्यामुळे जुने भांडण किंवा माहेर-सासरच्या गोष्टीवरून दोघांमध्ये खटके उडण्याचे प्रमाण वाढते. एकमेकांवर आरडाओरड आणि वाद वाढत जातात. वादाची तिव्रता वाढत गेल्यामुळे एकमेकांना टोमणे मारणे सुरू होते. संसारात काही पडलेले नाही, आता संसारात पूर्वीप्रमाणे रस राहिला नाही, अशी भावना पती-पत्नीमध्ये निर्माण होते. वाद झाल्यानंतर कुठेतरी बाहेर निघून काही तास घालवता येत नाही. त्यामुळे दोघांमध्ये घुसमट वाढत जाते. त्यामुळे पती-पत्नीत कोणताही वाद उद्‌भवल्यास त्यांनी आपसात संवाद साधून मिटविण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतरही एकमेकांमच्या मनात अढी असेल तर समूपदेशकांचा सल्ला घ्यावा. जर तेथेही समाधान न झाल्यास पोलिस किंवा कोर्टाची पायरी चढावी. परंतु, पोलिस ठाणे किंवा कोर्टात गेल्याने संसाराची घडी विस्कटण्याची जास्त शक्‍यता असते. 
- प्रा. राजा आकाश, 
मानसोपचार तज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com