शेतकऱ्यांनो, कोरोनाला महामारीचे नाव दिले म्हणून घाबरू नका; कोणत्या खासदाराने दिला हा सल्ला, वाचा

don't be afraid of Corona virus
don't be afraid of Corona virus

मौदा (जि. नागपूर) : कोरोना विषाणूने देशात हाहाकार माजवला आहे. मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येत आहेत. तसेच शहरात मृतांची संख्या चांगलीच वाढली आहे. रोज दोन अंकी संख्येत कोरोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली आहे. अशात खासदाराने शेतकऱ्यांना कोरोनाला न घाबरण्याचा सल्ला दिला आहे.

कोरोना काळात तालुका प्रशासन व आरोग्य विभागाने राबविलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी मौदा येथे शुक्रवारी आढावा बैठक घेतली. बैठकीत आमदार टेकचंद सावरकर, जिल्हा परिषद सभापती तापेश्ववर वैद्य, जिल्हा परिषद सदस्य अनिल निधान, योगेश देशमुख, शिवसेनेचे तालुका प्रमुख सदूकर हटवार, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदा लोहबरे, मितेश वांगे, सरपंच पोटफोडे, उपसभापती सौ थोटे, शिवसेनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

लोकं कोरोना चाचणी करायला घाबरत नाहीत. मात्र, क्वांरटाइन व्हावे लागेल या भीतीमुळे चाचणी करीत नाहीत. ऋतुबदल होत असताना सर्दी-खोकला, ताप यासारख्या आजाराची साथ येते. तो कोरोना नाही. नागरिकांच्या मनातील भीती घालविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे, तसेच मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे निर्देश दिले.

कोविड काळात उद्योगधंद्याची आर्थिक परिस्थिती ढाळासली आहे. शेती याच एकमेव व्यवसायावर येत्या काळात अर्थव्यवस्था टिकून राहणार आहे. हे लक्षात घेता शेतकऱ्यांना कोणतीही अडचण होणार नाही यासाठी प्रशासनाने कार्य करावे. छोटे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्यांवर पोलिस व प्रशासनाने सक्तीची कारवाई करू नये, अशा सूचना तुमाने यांनी दिल्या.

फक्त काळजी घ्या

कोरोनाला महामारीचे नाव दिले असले तरी कोरनोबाधितांचा मृत्यू दर अतिशय कमी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कोणीही घाबरू नये, फक्त काळजी घ्यावी, असा सल्ला रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी मौदा येथे शुक्रवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत शेतकऱ्यांना दिला.

अडचणी प्राधान्यक्रमाने सोडविणार

कृपाल तुमाने यांनी कोविड क्वारंटाइन सेंटर, आरोग्य विभागाची तयारी, डॉक्टरांची व औषधींची उपलब्धता याविषयी माहिती जाणून घेतली. अडचणी असल्यास त्या प्राधान्यक्रमाने सोडविण्याचे आश्वासन, खासदार कृपाल तुमाने यांनी दिले.

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com