रेल्वेचा प्रवाशांना दिलासा; नागपूरमार्गे आठ पूजा स्पेशल ट्रेन; घरच्यांसोबत राहण्याची इच्छा होणार पूर्ण

योगेश बरवड
Monday, 19 October 2020

भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान २२ ऑक्टोबर ते २ डिसेंबर दरम्यान द्विसाप्ताहिक पूजा स्पेशल ट्रेन चालविली जाईल. ०२८८० भुवनेश्वर-कमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक पूजा स्पेशल प्रत्येक सोमवार व गुरुवारी भुवनेश्वरहून रवाना होईल. ही गाडी ०२८७९ क्रमांकासह प्रत्येक बुधवार व शनिवारी एसटीटीहून परतीच्या प्रवासाला निघेल.

नागपूर : कोरोनामुळे सर्वच सण उत्सवांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. साधेपणाने सण साजरे होत असले तरी या काळात घरच्यांसोबत असावे अशी प्रत्येकाचीच धडपड असते. सणासुदीच्या दिवसांमध्ये प्रवासांची गरज लक्षात घेता रेल्वेकडून नागपूरमार्गे आठ पूजा स्पेशल गाड्या चालविण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

२० ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत कोरबा-अमृतसर-बिलासपूर त्रीसाप्ताहिक पूजा स्पेशल ट्रेन चालविली जाणार आहे. ०८२३७ कोरबा-अमृतसर पूजा स्पेशल ट्रेन प्रत्येक मंगळवार, बुधवार, शुक्रवारी कोरबाहू रवाना होईल. तसेच ०८२३८ अमृतसर-बिलासपूर पूजा स्पेशल ट्रेन प्रत्येक गुरुवार, शुक्रवार व रविवारी अमृतसरहून रवाना होईल. या गाडीला चार तृतीय श्रेणी, प्रत्येकी एक प्रथम व द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ११ स्लिपर व २ जनरल डबे राहतील.

अधिक वाचा - सोन्याला झळाळी; साठ हजारांचा आकडा करेल पार, ग्राहकांची पावले वळू लागली दुकानांकडे

भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान २२ ऑक्टोबर ते २ डिसेंबर दरम्यान द्विसाप्ताहिक पूजा स्पेशल ट्रेन चालविली जाईल. ०२८८० भुवनेश्वर-कमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक पूजा स्पेशल प्रत्येक सोमवार व गुरुवारी भुवनेश्वरहून रवाना होईल. ही गाडी ०२८७९ क्रमांकासह प्रत्येक बुधवार व शनिवारी एसटीटीहून परतीच्या प्रवासाला निघेल. चार तृतीय श्रेणी, प्रत्येकी एक प्रथम व द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ११ स्लिपर व २ जनरल डबे राहतील.

२५ ऑक्टोबर ते १ डिसेंबर दरम्यान पुरी-सूरत-पुरी साप्ताहिक पूजा स्पेशल ट्रेन धावेल. ०२८२७ पुरी-सूरत साप्ताहिक ट्रेन प्रत्येक रविवारी पुरीहून रवाना होईल. हिच गाडी ०२८२८ क्रमांकासह प्रत्येक मंगळवारी सुरतहून परतीच्या प्रवासाला निघेल. २० ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबरदरम्यान पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्या स्पेशल ट्रेन चालविण्यात येईल. ०२८६६ पुरी–लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल ट्रेन प्रत्येक मंगळवारी पुरीहून रवाना होईल. तसेच ०२८६५ लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी स्पेशल ट्रेन प्रत्येक गुरुवारी एलटीटीहून रवाना होईल.

अधिक माहितीसाठी - Video : हृदयाला फुटले पाझर; जेव्हा विधवा म्हणाली, ‘घरचा कर्ता पुरुष गेल्यावर जगायच कसं’

२० ऑक्टोबर ते १ डिसेंबर दरम्यान विशाखापट्टणम-निजामुदिन दरम्यान स्पेशल ट्रेन धावेल. ०२८१७ विशाखापट्टणम-हजरत निजामुद्दीन स्पेशल ट्रेन प्रत्येक मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी विशाखापट्टणम येथून रवाना होईल. ०२८१८ निजामुद्दीन-विशाखापट्टणम स्पेशल ट्रेन प्रत्येक गुरुवार, शुक्रवार, शनिवार, सोमवार व मंगळवारी निजामुद्दीनहून परतीच्या प्रवासाला निघेल.

२४ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान सांतरागाछीहून पुण्यासाठी साप्ताहिक पूजा स्पेशल ट्रेन चालविली जाईल. सांतरागाछी-पुणे साप्ताहिक पूजा स्पेशल ट्रेन सांतरागाछीहून प्रत्येक शनिवारी रवाना होईल. ही गाडी प्रत्येक सोमवारी पुण्याहून परतीच्या प्रवासाला निघेल. या गाडीला ६ तृतीय श्रेणी, २ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, १० स्लिपर डबे राहतील.

सविस्तर वाचा - इट्स रिअली नाईस... बांबू राईस!, मधुमेह, सांधेदुखी आदींपासून मिळेल आराम

२२ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर दरम्यान रक्सोल-एलटीटी दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट गाडी चालविण्यात येणार आहे. ०२५४५ रक्सोल-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट ट्रेन प्रत्येक गुरुवारी तर ०२५४६ लोकमान्य टिळक टर्मिनस - रक्सोल सुपरफास्ट ट्रेन प्रत्येक सोमवारी धावेल. २१ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान पोरबंदरहून हावड्यासाठी द्विसाप्ताहिक गाडी चालविली जाईल. ०९२०५ पोरबंदर-हावडा सुपरफास्ट विशेष ट्रेन प्रत्येक बुधवार व गुरुवारी रवाना होईल. तर, ०९२०६ हावडा-पोरबंदर सुपरफास्ट ट्रेन प्रत्येक शुक्रवार व शनिवारी धावेल.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight Pooja special trains via Nagpur