रोमॅंटिक कॅंडल लाईट डिनरच धाडस करू नका, केल तर हा आहे धोका...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

कमी मनुष्यबळात हॉटेल, हॉस्पिटल सुरू होणार असून अशा स्थितीत आगीचे धोके टाळण्यासाठी तसेच उपाययोजनेवर फायर ऍन्ड सिक्‍युरिटी असोसिएशन ऑफ इंडियातर्फे ऑनलाईन "टॉक शो'चे आयोजन करण्यात आले होते. त्यात मुख्य अग्निशमन अधिकारी उचके बोलत होते.

नागपूर : कोरोनामुळे सॅनिटायझर तसेच सोडिअम हायपोक्‍लोराईट आता जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अल्कोहोलचे प्रमाण असलेले लहान सॅनिटायझर प्रत्येकांकडेच आहे. अशावेळी मोठी हॉटेल सुरू झाल्यास "कॅंडल लाईट डिनर' बंद करावे लागणार आहे.

सोडियम हायपोक्‍लोराईटमुळे आगीची भीती नाही, परंतु आगीची झळ पोहोचल्यानंतर त्यातून विषारी वायू गळती होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आगीचा धोका नसलेल्या ठिकाणी सोडियम हायपोक्‍लोराईटचा साठा ठेवावा, अशा अनेक "टिप्स' महापालिका अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी हॉटेल व्यावसायिका, हॉस्पिटलचे संचालक, दुकानदारांना दिल्या.

हेही वाचा - पत्नीला पडला प्रश्‍न, पतीचा मृत्यू नेमका झाला कुठे? वाचा धक्‍कादायक प्रकार...

कमी मनुष्यबळात हॉटेल, हॉस्पिटल सुरू होणार असून अशा स्थितीत आगीचे धोके टाळण्यासाठी तसेच उपाययोजनेवर फायर ऍन्ड सिक्‍युरिटी असोसिएशन ऑफ इंडियातर्फे ऑनलाईन "टॉक शो'चे आयोजन करण्यात आले होते. त्यात मुख्य अग्निशमन अधिकारी उचके बोलत होते.

लॉकडाऊनमुळे सध्या मोठी हॉटेल्स बंद आहेत. मात्र, या काळातही वीज उपकरणे किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागू शकते. त्यामुळे अग्निशमन यंत्रणा स्वयंचलित "मोड'वर करू ठेवण्यची गरज असल्याचे उचके म्हणाले. भविष्यात मोठी हॉटेल्स सुरू होतील.

अधिक माहितीसाठी - अरे हे काय? व्हिडिओ क्लिप काढून करत होता ब्लॅकमेल, एका महिलेसह तिघांना...

हॉटेल्स सुरू करताना इलेक्‍ट्रिकची कामे करणाऱ्या तज्ज्ञांना सोबत ठेवावे. अल्कोहोल "बेस्ड' सॅनिटायझरमुळे आगीची शक्‍यता आहे. परिणामी किचनमध्ये त्याचा वापर टाळावा. रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये "कॅंडल लाईट डिनर'ची परंपरा आहे. अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर प्रत्येकजण वापरत असल्याने ही परंपरा मोडित काढावी लागणार आहे. 

साठा सुरक्षित ठेवावा 
हॉस्पिटलमध्ये सोडियम हायपोक्‍लोराईट मोठ्या प्रमाणात असते. अनेकदा शॉर्ट सर्किटमुळे आग लागते. त्यामुळे हॉस्पिटल संचालकांनी इलेक्‍ट्रॉनिक वस्तु, उपकरणे यापासून अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर, सोडियम हायपोक्‍लोराईटचा साठा दूर ठेवावा, असेही उचके म्हणाले.

क्लिक करा - छत्रपती शिवरायांनी तिनवेळा लुटले होते वऱ्हाडातील हे शहर

यंत्रणा सांभाळणाऱ्यांना प्राधान्य 
कमी मनुष्यबळात अग्निशमन यंत्रणेबाबत माहिती असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याची गरज आहे. तज्ज्ञ इलेक्‍ट्रिशियन कायम कामावर ठेवावे. एवढेच नव्हे तर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणेही आवश्‍यक असल्याचे उचके यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forget Romantic Candle Light Dinner