ब्रेकिंग ग्रामीण : हिंगणा तहसीलचे अधिकारी, कर्मचारी धास्तावले, कारण कार्यक्रमात होता "तो' कर्मचारी...

hingna tahasil
hingna tahasil


हिंगणा (जि.नागपूर) : ग्रामीण भागातील "मिनी मंत्रालय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. हा कर्मचारी कार्यालयात कामावर असल्याने इतर कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती पसरली आहे. तालुक्‍यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या95 च्या घरात पोहोचली आहे.

अधिक वाचा : पत्नीला पडला प्रश्‍न, पतीचा मृत्यू नेमका झाला ? वाचा धक्‍कादायक प्रकार...

हिंगणा तालुक्‍यात 95 कोरोनाबाधित रुग्ण
हिंगणा तालुका औद्योगिक क्षेत्र आहे. हिंगणा एमआयडीसी कोरोनाचा "हॉटस्पॉट' बनली आहे. ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हिंगणा तहसील कार्यालयात महसूल विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याची कोविडसंदर्भात तपासणी करण्यात आली. या तपासणीत मंडळस्तरावरील एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. हा कर्मचारी मागील काही दिवसांपासून तहसील कार्यालयात नियमित कामावर हजर होता. यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

अधिक वाचा : मंत्रिमहोदय, तुम्हीच सांगा, केव्हा होईल लागवड, केव्हा येईल फळ, का म्हणताहेत शेतकरी असे...

कार्यक्रमात "यांची' होती उपस्थिती
वानाडोंगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतिगृहात कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या
14 कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन ठेवण्यात आले होते. याची मुदत संपल्याने जवळपास 58 कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने निरोप 1 जुलै रोजी देण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, कोबी केअर समितीचे सचिव उपविभागीय अभियंता जे.के. राव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पडवे, खंडविकास अधिकारी महेंद्र जुवारे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमातही तहसील कार्यालयातील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला कर्मचारी उपस्थित होता. यामुळे कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे.
 
हेही वाचा : नोटांवर स्प्रे करताय...जरा थांबा

सतर्क झाले तहसील कार्यालय
कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांचे वास्तव्य नागपूर शहरात आहे. त्यांना उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. तहसील कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांची कोविडसंदर्भात तपासणी करण्यात आल्याची माहिती तहसीलदार संतोष खांडरे यांनी दिली. या चाचणीनंतर आलेल्या अहवालात हा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळून कार्यालयात कर्मचाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com