ऑनलाइन परीक्षांनी वाढला निकालाचा टक्का, पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेवर होणार परिणाम

मंगेश गोमासे
Monday, 30 November 2020

अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर नागपूर विद्यापीठाने ऑनलाईन बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. ही परीक्षा केवळ ५० गुणांची असून, उर्वरित ५० आंतरिक गुणांची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपवली.

नागपूर : विद्यापीठ व महाविद्यालयीन अंतिम वर्षाच्या ऑनलाइन बहुपर्यायी परीक्षेचा निर्णय विद्यार्थ्यांच्या पथ्यावर पडला असून, यंदा अंतिम वर्षाच्या निकालात वाढ झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सर्व शाखांच्या निकालात ३० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली. कोरोनाकाळात झालेल्या या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी नाममात्र ठरल्याने निकालात बरीच मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. याचा परिणाम येणाऱ्या प्रवेश प्रक्रियांवर पडणार आहे. 

हेही वाचा - बाबा आमटेंची नात ते महारोगी सेवा समितीच्या सीईओ, डॉ....

अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर नागपूर विद्यापीठाने ऑनलाईन बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. ही परीक्षा केवळ ५० गुणांची असून, उर्वरित ५० आंतरिक गुणांची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपवली. यंदा प्रश्नपत्रिकांचे स्वरूप, माध्यमही बदलले. महाविद्यालयांकडे ५० आंतरिक गुणांची जबाबदारी सोपवल्याने विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले. त्यामुळे आतापर्यंत जाहीर झालेल्या सर्वच अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. वाणिज्य (बी.कॉम), कला (बीए), विज्ञान (बीएस्सी) यांचे अंतिम सत्राचे निकाल दरवर्षी साधारणपणे ६० ते ७० टक्के लागतात. मात्र, यंदा ९५ टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. परिणामी आधीचे पदवीधर आणि कोरोनाकाळातील ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या पदवीधरांच्या टक्केवारीमध्येही ३० ते ४० टक्क्यांची दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे परीक्षा नाममात्र ठरल्याचे चित्र दिसून येते. 

हेही वाचा - 'War and Peace' : आत्महत्येच्या काही...

विशेष म्हणजे या बी.कॉममध्ये १० हजार ३५७ विद्यार्थी, बीएस.स्सी.मध्ये ९ हजार ५६७ विद्यार्थी आणि बीए ९ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. नागपूर विद्यापीठाचे विविध विभाग आणि संलग्नित महाविद्यालयाच्या जागांकडे बघितल्यास एम.कॉम. तीन हजार, एमएस.स्सीच्या १ हजार ९८६, एम.ए. १० हजार ८६५ जागांचा समावेश आहे. याशिवाय एमएस.स्सी फॉरेन्सिक सायन्स, एम.लिब, एम.कॉम  प्रोफेशनल यासारख्या २० अभ्यासक्रमात २४० पेक्षा अधिक जागा आहेत. या जागांवरही विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होणार आहे. 

हेही वाचा - ‘ई सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत काय म्हणाल्या होत्या डॉ....

परीक्षा नाममात्रच -
विद्यापीठाद्वारे विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. त्यात प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बहुपर्यायी होते. त्यातही एका तासात म्हणजे साठ मिनिटांत विद्यार्थ्यांना द्यायची होती. ५० पैकी केवळ २५ प्रश्नांची उत्तरे एका तासात खूप कमी प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळ खूप मिळाला. विद्यार्थी परीक्षा देत असताना नियमन करण्यास मर्यादा होत्या. त्यामुळे परीक्षांचे निकाल वाढल्याचे दिसून येत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: increasing result percentage may affect post graduation admission process in nagpur university