हिंगणा तालुक्‍यात 36 डिजिटल अंगणवाड्यांना "आयएसओ' मानांकन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

हिंगणा तालुक्‍यातील 284 अंगणवाड्या डिजिटल करण्यात आल्या. शासनाच्या धोरणानुसार "पेपरलेस वर्क' करण्यासाठी डिजिटल अंगणवाड्यांना प्राधान्य दिले. डिजिटल अंगणवाड्या करण्यासाठी अंगणवाड्यांची संपूर्ण इमारतीचा "लूक' बनवण्यात आला.

हिंगणा (जि.नागपूर) : तालुक्‍यातील 36 डिजिटल अंगणवाड्यांना "आयएसओ'चे मानांकन प्राप्त झाले आहे. यामुळे डिजिटलमध्ये नागपूर जिल्ह्यात हिंगणा तालुका प्रथम क्रमांकावर आहे. अंगणवाडी सेविकांना "अपडेट' राहण्यासाठी मोबाईलचे वितरणही करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाड्यांचे कामकाज चालते. शिक्षणाची सुरुवात अंगणवाडीपासून होते. यामुळे केंद्र शासनाने सर्व राज्यांतील अंगणवाड्यांना डिजिटल करण्याचे आदेश दिले. यानुसार हिंगणा तालुक्‍यातील 284 अंगणवाड्या डिजिटल करण्यात आल्या. शासनाच्या धोरणानुसार "पेपरलेस वर्क' करण्यासाठी डिजिटल अंगणवाड्यांना प्राधान्य दिले. डिजिटल अंगणवाड्या करण्यासाठी अंगणवाड्यांची संपूर्ण इमारतीचा "लूक' बनवण्यात आला. लहान मुले अंगणवाडीकडे कसे आकर्षित होतील यासाठी प्रयत्न करण्यात आला.
क्‍लिक करा  :  जिच्यावर केला विश्‍वास तिनेच मारला झाडू...

जिल्ह्यात हिंगणा तालुका प्रथम
अंगणवाडी सेविकांना अलर्ट करण्यासाठी 284 मोबाईल वितरित करण्यात आले. या मोबाईलमध्ये स्वतंत्र ऍप देण्यात आले आहे. प्रत्येक अंगणवाडी सेविकेला पासवर्डसुद्धा देण्यात आला आहे.अंगणवाडीत दाखल होणाऱ्या प्रत्येक बालकाची माहिती "अपडेट' केली जात आहे. बालकाला लसीकरण केव्हा द्यायचे, याचीसुद्धा नोंद केली जात आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने अंगणवाड्यांची रंगरंगोटी करण्यासाठी दहा टक्‍के निधी दिल्याने जवळपास संपूर्ण अंगणवाड्यांना रंगरंगोटी करून सुशोभित करण्यात आले आहे. अंगणवाडीतील बालकांसाठी शालेय पोषण आहार योजनासुद्धा राबवण्यात येत आहे. अंगणवाड्या डिजिटल झाल्याने मुलेही मोठ्या प्रमाणात अंगणवाडीत प्रवेश घेऊ लागली आहेत.

क्‍लिक करा  :  युवतीने केला "स्पीड चेक' अन्‌ घडले विपरित

अंगणवाडी सेविकांना मोबाईल
हिंगणा तालुक्‍यात अंगणवाड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील 36 अंगणवाड्यांना आयएसओचा दर्जा मिळाला. यात सावंगी, आमगाव, भानसोली लोधी, हळदगाव, खापरी मोरेश्वर, गोंडवाना, घोडेघाट, गणेशपूर, टाकळघाट (1), टाकळघाट(2), टाकळघाट(3), टाकळघाट, सालई दाभा, गुमगाव, गुमगाव(2), गुमगाव(3), गुमगाव (4), गुमगाव (5), वागधरा(1), वागधरा (2), वागधरा (3), वागधरा(4), धानोली, शिरूळ (1), शिरूळ(2), टेंभरी (1), टेंभरी (2), कान्होलीबारा, सावंगी, आमगाव, देवळी पेढरी, देवळी आमगाव, नीलडोह, वडधामना, पेंढारी, आमगाव आदी गावांचा समावेश आहे.

क्‍लिक करा  :  ऐकावं ते नवलच, उन्हाळी परीक्षेचा डेटाच गुल

 

पुन्हा ग्रामपंचायती होतील "आयएसओ'
ग्रामपंचायत प्रशासनाचे सहकार्य लाभल्यास पुन्हा काही अंगणवाड्यांना "आयएसओ'चा दर्जा मिळण्याची शक्‍यता आहे. अंगणवाडी सेविकांच्या परिश्रमांमुळेच जिल्ह्यातून तालुका आघाडीवर आहे.
बापूसाहेब चिंचाने
एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, हिंगणा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ISO digital rating of 36 digital courtyards in Hingana taluka