महापौर भडकले, म्हणाले जनतेला त्रास झाल्यास खैर नाही...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

नागपूर : जनता दरबारमध्ये आलेल्या तक्रारींवर तोडगा न काढल्यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाबाबत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आज महापौर संदीप जोशी यांनी दिला. स्वच्छता, पाणी, उद्यानातील सुविधा अशा समस्यांवर त्वरित कार्यवाही करून नागरिकांना दिलासा मिळू शकतो. मात्र या समस्यांसाठीही नागरिकांना चकरा माराव्या लागत असल्याबाबत महापौरांनी तीव्र संताप व्यक्त केला.

नागपूर : जनता दरबारमध्ये आलेल्या तक्रारींवर तोडगा न काढल्यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाबाबत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आज महापौर संदीप जोशी यांनी दिला. स्वच्छता, पाणी, उद्यानातील सुविधा अशा समस्यांवर त्वरित कार्यवाही करून नागरिकांना दिलासा मिळू शकतो. मात्र या समस्यांसाठीही नागरिकांना चकरा माराव्या लागत असल्याबाबत महापौरांनी तीव्र संताप व्यक्त केला.

लक्ष्मीनगर झोनमधील जनता दरबारमध्ये महापौर संदीप जोशी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. झोनमधील 75 नागरिकांनी महापौरांपुढे समस्या मांडल्या. या वेळी लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती तारा (लक्ष्मी) यादव, शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक सर्वश्री लखन येरवार, लहूकुमार बेहते, किशोर वानखेडे, नगरसेविका सोनाली कडू, पल्लवी श्‍यामकुळे, मीनाक्षी तेलगोटे, वनिता दांडेकर, माजी नगरसेवक ओमप्रकाश (मुन्ना) यादव, लक्ष्मीनगर झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे, कार्यकारी अभियंता धनंजय मेंडुलकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी नागरिकांनी अतिक्रमण, मलवाहिनी, उखडलेले रस्ते, कचरा, विद्युत दिवे, मोकळ्या भूखंडांवरील अस्वच्छता, मोकाट कुत्रे, डुकरांचा त्रास, उद्यानातील असुविधा अशा विविध विषयांवर तक्रारी मांडल्या.

मलवाहिनी अस्वच्छ
प्रियदर्शिनी सोसायटीतील मलवाहिनीची समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. मलवाहिनी स्वच्छ करण्याबाबत स्थानिक नागरिकांकडून होत असलेला विरोध लक्षात घेता सदर ठिकाणी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

अतिक्रमण
अनेकांनी अतिक्रमणासंदर्भात तक्रार केली. अधिकाऱ्यांनी अतिक्रमणस्थळी भेट देऊन पाहणी करावी व त्यानंतर पुढील कारवाई करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. आवश्‍यकता असलेल्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त घेऊन कारवाई करण्याची सूचना त्यांनी केली.

- ... म्हणून स्टेचरवरून नेले मतदानासाठी, हे होते कारण?

उद्यानांमध्ये असामाजिक तत्त्वांचा वावर
उद्यानांमध्ये वीजखांबांवर एलईडी दिवे न लावल्याने तेथे असामाजिक तत्त्वांचा वावर वाढल्याची तक्रार नागरिकांनी केली. यावर विद्युत विभागाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. उद्यानांना सुरक्षाभिंत, वॉकिंग ट्रॅक, ग्रीन जीम लावण्याचे निर्देश त्यांनी उद्यान विभागाला दिले.

मोकळ्या भूखंडांवर कचरा
मोकळ्या भूखंडांवर कचरा टाकला जातो. त्यामुळे परिसरात अस्वच्छता असल्याची तक्रार नागरिकांनी केली. मोकळ्या भूखंडांसंदर्भात मनपातर्फे निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच भूखंड मालकांना अल्टिमेटम देऊन निर्धारित कालावधीत बांधकाम न केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.

- नागपुरात आयकर विभागाची धडक कारवाई, चार व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर छापे
 

स्वच्छता अधिकारी गायब
परिसरात स्वच्छता कर्मचारी नियमित येत नसल्याची तक्रार नागरिकांनी मांडली. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परिसरातील नागरिकांकडे आपल्या येण्याची वेळ नोंदवावी. नागरिकांकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांबाबत नकारात्मक शेरा दिसल्यास त्या कर्मचाऱ्यासह स्वच्छता निरीक्षकांना कारवाईचा इशारा महापौरांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: janta darbar of mayor sandeep joshi