नागपुरातील कोणते परिसर सील करण्यात आले आहेत...वाचा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जून 2020

महापालिकेने आतापर्यंत 42 वस्त्या प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले. यातील 11 वस्त्यांतील निर्बंध हटविले.

नागपूर : कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने गांधीबाग-महाल झोनमधील चिचघरे मोहल्ला, आशीनगरमधील आझादनगर टेका, लष्करीबाग येथील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. या परिसरातील नागरिकांना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला असून बाहेरील नागरिकांनाही येथे प्रवेश करता येणार नाही. 

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

महापालिकेने आतापर्यंत 42 वस्त्या प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले. यातील 11 वस्त्यांतील निर्बंध हटविले. गांधीबाग-महाल झोनमधील प्रभाग क्रमांक 22 मध्ये चिचघरे मोहल्ला येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला.

या क्षेत्रातील उत्तर पूर्वेस रवी उमरेडकर यांचे घर, उत्तर पश्‍चिमेस पंढरी आंबुलीकर, दक्षिण पश्‍चिमेस एकनाथ मौंदेकर, दक्षिण पूर्वेस यादवराव खोत यांच्या घरापर्यंतचा परिसरातील जीवनावश्‍यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद राहील. याशिवाय या परिसरात बाहेरील लोकांना प्रवेश करता येणार नाही. या परिसरातील नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीवगळता बाहेर पडता येणार नाही. या परिसरात डॉक्‍टर, नर्स, वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रवेश राहील.

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!   

आशीनगर झोनमधील प्रभाग क्रमांक 7 मध्ये लष्करीबाग समता मैदान परिसरातही रुग्ण आढळून आला. यामुळे लष्करीबाग समता मैदानच्या दक्षिण पश्‍चिमेस चंद्रपाल रिपेअरिंग सेंटर, उत्तर पश्‍चिमेस शीतला माता मंदिर, उत्तर पूर्वेस तक्षशीला बुद्धविहार, दक्षिण पूर्वेस निशांत बोदेले यांचे घरापर्यंतचा परिसर सील करण्यात आला. प्रभाग क्रमांक 6 मधील आझादनगर टेका नाका परिसराच्या उत्तर पूर्वेस दारूल उलूम सरकार लाजुलआलिया मदरसा, उत्तर पूर्वेस बब्बू गॅरेज, दक्षिण पूर्वेस नूर मोहम्मद यांचे घर, दक्षिण पश्‍चिमेस चांभार नाल्यापर्यंतच्या परिसरात निर्बंध लावण्यात आले. 

सिरसपेठेतील नागरिकांना दिलासा 
गांधीबाग महाल झोनमधील प्रभाग 18 तील सिरसेपठ परिसर कोरोनाबाधितामुळे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले होते. येथील नागरिकांनाही विलगीकरणात पाठविण्यात आले होते. विलगीकरणातील नागरिकांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असून इतर कुणीही कोरोनाबाधित आढळले नाही. त्यामुळे सुभाष बांगर यांचे घर, बावनकर यांचे घर, पिंपळकर यांचे घर, बुर्रेवार यांच्या घरापर्यंतचा परिसर मोकळा करण्यात आला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: laskaribagh, teka, chichghare mohalla area sealed