हिवाळी परीक्षेला २० मार्चचा मुहूर्त; प्रात्यक्षिक सोमवारपासून; सर्व परीक्षा ऑनलाइन

March 20 for the winter exams Nagpur university news
March 20 for the winter exams Nagpur university news

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या हिवाळी परीक्षा २० मार्च ते ३० एप्रिलदरम्यान घेण्याची घोषणा केली आहे. ८ ते २० मार्च दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्यावर्षी कोरोनामुळे विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा मार्च महिन्यात पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यानंतर बऱ्याच उशिरा म्हणजे, ऑक्टोबर महिन्यात उन्हाळी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. त्यांचा निकाल डिसेंबरमध्ये घोषित करण्यात आला. मात्र, यामुळे सत्र लांबल्याने नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात घेण्यात येणाऱ्या हिवाळी परीक्षांवर त्याचा मोठा परिणाम झाला. या परीक्षांची घोषणा न झाल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली होती.

ही परीक्षा ऑफलाइन की ऑनलाइन याबाबतही विद्यार्थ्यांच्या मनात शंका होती. यातूनच विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा घेण्याची मागणी केली होती. दरम्यान नागपूर दौऱ्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ ऑनलाइन परीक्षा घेणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला होता. आता २० मार्चपासून विद्यार्थ्यांची ऑनलाइन हिवाळी परीक्षा होणार आहे. याशिवाय पुढल्या महिन्याच्या शेवटी उन्हाळी परीक्षाही घेण्याचा मानस आहे. 

केवळ पारंपारिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा

केंद्रीय पद्धतीने प्रवेश घेण्यात आलेल्या बीई, बी.टेक, फार्मसी, एमबीए, बी.एड., एलएलबीच्या प्रथम सत्रांच्या परीक्षांचा यात समावेश करण्यात आला नसून घोषित तारखांमध्ये केवळ पारंपारिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येईल. या सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहेत. 

परीक्षेत होणार मोठा बदल

उन्हाळी परीक्षा २०२० मध्ये झालेल्या चुकांमधून धडा घेऊन परीक्षा पद्धतीत मोठा बदल घडविण्याच्या प्रयत्न आहे. मिक्स प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांना एमसीक्यू, रिक्त जागा भरा, जोड्या जोडा, लहान उत्तरे, लांब उत्तरे यासारखे प्रश्न सोडवावे लागतील. विद्यापीठाची टास्क फोर्स परीक्षेच्या सविस्तर मार्गदर्शक तत्त्वासाठी काम करीत आहे. 

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या बाबी

  • ५० पैकी २५ प्रश्न सोडविण्याचा पर्याय नसेल 
  • सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य 
  • परीक्षेत मिक्स प्रकाराचे प्रश्न असतील 
  • कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी ‘प्रॉक्टोरिंग'ची व्यवस्था 
  • शनिवार-रविवारीही पेपर राहण्याची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com