अभिमानास्पद! महाराष्ट्रात नागपूर जिल्हा अव्वल; १०१ टक्के लाभार्थ्यांना लाभ

Nagpur district tops in Matruvandan scheme
Nagpur district tops in Matruvandan scheme

नागपूर : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्रात नागपूर अव्वल ठरला आहे. जिल्ह्यात १०१ टक्के लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला आहे.

जानेवारी २०१७ पासून ही योजना सुरू करण्यात आली. यामध्ये राज्यात २१ लाख ३६ हजार ५५१ महिलांनी योजनेच्या लाभासाठी नोंदणी केली. नागपुरातील ८९ हजार २१३ महिलांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात रोजंदारीवर काम करणाऱ्या स्त्रिया बाळंतपणानंतर आपल्या कामावर गेल्याने बाळाला आईचे दूध मिळत नाही, बाळाचेही पोषण होत नाही व कुपोषणाची समस्या जन्म घेते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ सुरू केली.

ही योजना ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’मार्फत राबविली जाते. नोंदणी केल्यानंतर दीड महिन्यांनी एक हजार रुपये दिले जातात. दुसऱ्या टप्प्यातील मदत प्रसूतिपूर्व साधारणत: ६ महिन्यानंतर सरकारी रुग्णालयातील तपासणीनंतर २ हजार रुपये. तर तिसऱ्या टप्प्यातील मदत ही प्रसूतीनंतर बाळ साडेतीन महिन्याचे झाल्यानंतर दिले जाते.

योजना सुरू झाल्यापासून ९ नोव्हेंबर २०२० पर्यंत नागपूर जिल्ह्यात ८९ हजार २१३ महिलांनी नोंदणी केली. यातील ८१ हजार ३७ महिलांना पहिल्या टप्प्यातील मदत दिली. ८१ हजार २२१ महिलांना दुसऱ्या टप्प्यातील तर ६१ हजार २२६ महिलांना तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील मदत वितरित करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यात आजवर ३६ कोटी ५९ लाख ३१ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. योजनेत चंद्रपूर जिल्हा ९७ टक्‍क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com