नागपूर पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागण्यास उशीर का झाला?

nagpur graduation constituency election result announce very late
nagpur graduation constituency election result announce very late

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी आठ वाजता मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सुरुवात झाली. मात्र, या मतमोजणीचा निकाल यायला दुसरा दिवस उजाडला. एकूण नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यात एकूण १ लाख ३२  हजार ९२३ पहिल्या पसंतीक्रमातील मतांच्या मोजणीनंतर दुसऱ्या पसंतीक्रमासाठी २४ हजार २२०, अशा एकूण १ लाख ५१ हजार १४३ मतांच्या मोजणीसाठी प्रशासनाला ३० तासांचा कालावधी लागल्याचे दिसून आले. 

विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी बुधवारी (ता.२) सांगितल्याप्रमाणे ५ वाजेपर्यंत निकालाचा ट्रेंड कळेल, असे भाकीत व्यक्त केले होते. प्रशासनाकडून मतमोजणीसाठी सुसज्ज यंत्रणा तयार करण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, प्रत्यक्षात त्यांचा दावा फोल ठरल्याचे दिसून आले. गुरुवारी सायंकाळी साडेसहापर्यंत साधी आकडेवारी तयार नसल्याचे दिसून आले. मतमोजणी केंद्रात सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. सुरुवातीला नागपूर आणि सहा जिल्ह्यातील मतपेट्याना एकत्र करण्यात आले. त्यात २५ मतपत्रिकाचे गठ्ठे तयार करत एकूण मतदान मोजण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेला दुपारी २ वाजले. त्यानंतर दुपारी  ३ वाजता २८ टेबलवर १००० मतदान याप्रमाणे मतमोजणीला सुरुवात झाली. मात्र, प्रत्यक्षात गठ्ठे बांधून त्यांची मोजणी करण्यास २ वाजता सुरुवात करण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांची बॅलेट पेपर मोजण्याची गती मंदावल्याचे दिसून आले. त्यामुळे पहिल्या पसंतीक्रमातील मतांच्या मोजणीताल १ लाख ३२  हजार ९२३ मतांच्या २८ हजाराच्या पहिल्या फेरीचा निकाल सायंकाळी ७ वाजता आला. शिवाय रात्री १० वाजता दुसऱ्या तर तिसऱ्या फेरीचा निकालाला रात्री १२ वाजले. त्यानंतर चौथ्या फेरीचा निकाल दोन वाजता देण्यात आला. यामुळे मतमोजणीच्या संथगतीवर उमेदवारासह कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे यंत्रणेवर बराच आक्षेप घेण्यात आला. 

आयुक्तांचीही नाराजी -
सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीच्या कामास सुरुवात झाल्यावर निकाल येण्यास उशिर होत असल्याचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या निदर्शनास आले. मतमोजणी दरम्यान होत असलेल्या दिरंगाईमुळे विभागीय आयुक्तांनी मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. यावेळी मतमोजणीत कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची तंबी त्यांनी दिली. याशिवाय त्यामुळे उद्यापर्यंत मतमोजणी लांबणार असल्याचेही ते म्हणाले. रात्री अकरा वाजले तरी तिसऱ्या फेरीचे निकाल आले नव्हते हे विशेष.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com