'जीएसटी'ची चोरी करणारा अटकेत, तीन दिवसांतील चौथी कारवाई

nagpur GST department raid on shops in nagpur
nagpur GST department raid on shops in nagpur

नागपूर : वस्तू आणि सेवा विभागाच्या नागपूर विभागीय कार्यालयाने शहरातील पेंट, सिमेंट आणि लोखंड उत्पादनाची विक्री करणाऱ्या ट्रेडिंग प्रतिष्ठानाची तपासणी केली. यावेळी ३५ कोटीचे बनावट इनव्हाईस तयार करुन तीन कोटी ५१ लाखाचे खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे उघड झाले. त्यातील दोन कोटी ७५ लाखाच्या वस्तू व सेवा करांची वसूल करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

आरोपीने छत्तीसगड येथील अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या नावाने ३५ कोटीच्या बनावट पावत्या तयार केल्या होत्या. त्याआधारे ३ कोटी ५१ लाखाचे खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतले. त्यातील दोन कोटी ७५ लाखाची वस्तू व सेवा कराची वसूली विभागाने केली आहे. जीएसटी विभागाकडून जीएसटी चोरी करणाऱ्यांवर केलेल्या कारवाईवरुन उघड झाले आहे. गेल्या तीन दिवसातील ही चौथी कारवाई असल्याने जीएसटीची चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

जीएसटी विभागाचे अधिकाऱ्यांनी १९ तारखेला छापा टाकला आणि तपासणी केली. त्यात दिलेल्या पत्त्यावर ट्रेडिंग फर्म अस्तित्वात नसून त्या परिसरात एक प्रिंटिंग प्रेस कार्यरत असल्याचे दिसले. ज्या मालकाच्या नावाने ते प्रतिष्ठान आहे. त्याचीही माहिती मिळू शकली नाही. मात्र, ट्रेडिंग प्रतिष्ठानाच्या मालकाचा शोध घेऊन अटक करण्यात आली. सुरुवातीच्या काळात प्रोप्रायटरने ट्रेडिंग फर्मशी कोणताही संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे संबंधित कागदपत्रांची सविस्तर तपासणी करण्यात आली. तपासणी केली असता अटक केलेल्या व्यक्तीनेच बनावट ट्रेडिंग कंपनीचा मालक असल्याचे सिद्ध झाले. 

बनावट पावतीवर पाच कोटीची जीएसटी चोरी -
बनावट पावत्यावर खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्यासंदर्भात सुरू असलेल्या तपासात डीजीजीआय, नाशिक प्रादेशिक विभाग, डीजीजीआय, नागपूर विभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी नाशिकच्या नामांकित बांधकाम व्यावसायिकाला अटक केली. हा व्यावसायिक अस्तित्त्वात नसलेल्या कंपनीने जारी केलेल्या बनावट पावत्यांवर खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट घेत आहे. या बनावट क्रेडिटचा उपयोग जीएसटी विवरणपत्र दाखल करण्यासाठी करत आहे, अशी माहिती डीजीजीआयला मिळाली होती. या व्यावसायिकाने ओळख पटू नये यासाठी आपली पूर्वीची नोंदणी रद्द केली होती आणि वेगळ्या व्यवस्थापनाअंतर्गत नवीन नोंदणी केली. मात्र, ऑनलाइन माहितीच्या मदतीने रद्द केलेल्या नोंदणीची संपूर्ण माहिती मिळवण्यात आली आणि खोटे इनपुट क्रेडिट घेतल्याचे छाप्यादरम्यान आढळून आले. 

पश्चिम बंगालमधील अस्तित्वात नसलेल्या आणि कोणतीही वस्तू किंवा सेवा पुरवली नाही अशा काही कंपन्यांनी जारी केलेल्या इनव्हॉईसच्या आधारे या बांधकाम व्यावसायिकाने चार कोटी ८६ लाख रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला आहे. वस्तूस्थिती मांडण्यात आली तेव्हा चौकशी दरम्यान हे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याची कबुली त्याने दिली.  अतिरिक्त महासंचालक, डीजीजीआय, नागपूर विभागीय युनिट यांनी दिलेल्या अटक-वॊरंटच्या आधारे या बांधकाम व्यावसायिकाला, डीजीजीआय, नाशिक प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. बांधकाम व्यावसायिकाने आत्तापर्यंत 25 लाख रुपये दिले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com