esakal | उत्कंठा ताणली जात असताना अमिताभ बच्चन म्हणाले, ‘आप २५ लाख की धनराशी जीत चुके है’
sakal

बोलून बातमी शोधा

Narkhed youth won KBC Rs twenty five lakh

न १९९०च्या दहावीच्या बॅचचा न. प. हायस्कूलचा तो माजी विद्यार्थी. आज स्वप्नील मुंबई येथे एका नामांकीत कंपनीत मोठ्या पदावर काम करतो आहे. स्वप्नीलचे सामान्यज्ञान सुरुवातीपासूनच खूप छान असल्याचे त्याचे गावातील मित्र सांगतात. याचीच प्रचिती त्याने ‘केबीसी’ साऱ्या जगाली आणून दिली.

उत्कंठा ताणली जात असताना अमिताभ बच्चन म्हणाले, ‘आप २५ लाख की धनराशी जीत चुके है’

sakal_logo
By
अतुल दंढारे

मेंढला (जि. नागपूर) : ‘करोडपती’ होण्याचे स्वप्न कोण पाहत नाही? परंतु, श्रीमंत होण्याची इच्छा एखाद्याचीच पूर्ण होते बरं का! नशीबाची साथ मिळाली की तो ‘मुकद्दर का सिकंदर’ व्हायला वेळ लागत नाही. त्यासाठी कुठला वशिला वगैरे लागत नाही. नरखेड शहरातील स्वप्नीलचे मात्र नशीब उजळले. ‘कौन बनेगा करोडपती’या कार्यक्रमात त्याला महानायकासोबत करोडपती होण्याची संधी प्राप्त झाली. नुकत्याच सुरू असलेल्या लोकप्रिय मालिकेत त्याला पंचवीस लाखांपर्यंत मजल मारता आली आणि तो लखपती झाला.

युवकाचे नाव स्वप्नील रमेश चौहान (रा. नरखेड) असे आहे. अत्यंत हुशार, निडर आणि तल्लख बुद्धी हे स्वप्नीलचे गुणवैशिष्ट्ये. सन १९९०च्या दहावीच्या बॅचचा न. प. हायस्कूलचा तो माजी विद्यार्थी. आज स्वप्नील मुंबई येथे एका नामांकीत कंपनीत मोठ्या पदावर काम करतो आहे. स्वप्नीलचे सामान्यज्ञान सुरुवातीपासूनच खूप छान असल्याचे त्याचे गावातील मित्र सांगतात. याचीच प्रचिती त्याने ‘केबीसी’ साऱ्या जगाली आणून दिली.

अधिक माहितीसाठी - स्वयंघोषित सर्पमित्रांमुळे जीव धोक्यात; वाढत्या तस्करीमुळे संकल्पनाच काढली मोडीत

त्याची निवड ‘केबिसी’त झाल्यानंतर आभाळ ठेंगणे झाले. मजल दरमजल करीत तो बुधवारी २५ लाखांपर्यंत पोहोचला. एक कोटी जिंकण्याची उमेद त्याच्यामध्ये दिसून येत होती. टीव्हीसमोर सगळ्यांची उत्कंठा ताणली जात असताना एका कठीण प्रश्‍नाजवळ मात्र तो थबकला. त्याने पुढील ‘रिस्क’ न घेता २५ लाखांवर थांबण्याचा निश्‍चय केला. महानायक अमिताभ बच्चन यांच्या सर्व प्रश्नांना त्याने अचूक उत्तरे दिली.

औरंगाबादेतून अभियांत्रिकीचे शिक्षण

न. प. शाळा येथील सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती चौहान यांचा स्वप्नील धाकटा मुलगा. शालेय शिक्षण न. प. शाळा क्र. ५, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण शाळा क्र. १ आणि अकरावी व बारावी स्वप्नीलने नाडेकर कनिष्ठ महाविद्यालयात केले. विज्ञान शाखेतीन शिक्षण घेऊन नंतर युडिसीटी औरंगाबाद येथून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.

ठळक बातमी -  मुलाला असलेले मोबाईलचे वेड बेतले वडिलांच्या जीवावर; कुटुंबातील कर्त्या पुरुषाने उचलले टोकाच पाऊल

अर्जुनच्या शिक्षणासाठी पाच लाखांची स्कॉलरशिप

स्वप्नील आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे. ‘केबीसी’ सारख्या जागतिक दर्जाच्या कार्यक्रमात आणि अमिताभसारख्या महानायकाच्या प्रश्नाला सामोरे जाताना जो आत्मविश्वास, ज्ञान आणि चातुर्याचे तू जे दर्शन घडविले त्याचा आम्हाला अभिमान असल्याच्या भावना त्याचे गावचे मित्र व्यक्त करतात. तो या मालिकेत २५ लाख रुपये जिंकून थांबला. स्वप्नीलचा मुलगा अर्जुन स्वप्नील चव्हाण (वय १५) याच्या पुढील शिक्षणासाठी पाच लाख रुपये स्कॉलरशिप अमिताभने जाहीर केली, तेव्हा स्वप्नील भावविभोर झाला. एमआयडीसीत युवकांसाठी एखाला ‘प्रोजेक्ट’ सुरू करण्याचा त्याने मानस व्यक्त केला. त्याच्या या विजयाने गावात बुधवारी आनंदाचे वातावरण होते.

संपादन - नीलेश डाखोरे