
वोकल फॉर लोकलकडे मार्गस्थ होताना भारतातील युवा पिढी आता दररोज नवनवीन क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहे. मात्र, भारतीय बनावटीचे सर्च इंजिन नसल्याची खंत राजेशला होती. त्यातूनच भारतीय बनावटीचे वैशिष्ट्यपूर्ण सर्च इंजिन तयार केले असून त्या क्षेत्रातही पाय रोवण्यास तयार आहे.
नागपूर : जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि अधिकाधिक वापर केला जाणारे सर्च इंजिन म्हणजे गुगलची ख्याती आहे. या सर्च इंजिनासोबत स्पर्धा करणे म्हणजे स्वप्नच अशी सर्वांची धारणा होती. मात्र, त्याला टक्कर देण्यासाठी 'क्यूमामू' हे भारतीय बनावटीचे खासगी सर्च इंजिन सज्ज झाले आहे. हे सर्च इंजिन प्रति टिचकी निः शुल्क सेवा देत असून अशा प्रकारच्या कमांड्समुळे माहिती मिळणे सहज शक्य होणार आहे. गुजरात येथील २२ वर्षीय युवक निशिथ धानाणी यांनी क्यूमामू टेक्नॉलॉजी प्रा. लि.च्या माध्यमातून हे स्टार्ट अप तयार केले आहे.
हेही वाचा - सावधान! आठ दिवसांत ४ हजार रुग्णांची वाढ, नव्याने साडेसातशे बाधित; मृत्यूही वाढले
वोकल फॉर लोकलकडे मार्गस्थ होताना भारतातील युवा पिढी आता दररोज नवनवीन क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहे. मात्र, भारतीय बनावटीचे सर्च इंजिन नसल्याची खंत राजेशला होती. त्यातूनच भारतीय बनावटीचे वैशिष्ट्यपूर्ण सर्च इंजिन तयार केले असून त्या क्षेत्रातही पाय रोवण्यास तयार आहे. हे सर्च इंजिन भारतीय आणि लहान व्यावसायिकांना लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने तयार केले आहे. यामाध्यमातून ज्या व्यक्तीने एखादी माहिती शोधली असेल तर त्याचा डाटा तो आपल्याजवळ ठेवत नाही. तसेच वापरकर्त्याचा मागोवाही घेत नाही. इतर सर्च इंजिन आपण काय शोधले, कुठे गेला होता याची माहिती गोळा करीत असल्याने आपली खासगी माहितीही इतरत्र जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सर्च इंजिन अतिशय सुरक्षित आहे. हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. इतर सर्च इंजिनाच्या तुलनेत क्यूमामू पाच पट अधिक वेगाने हवी असलेली माहिती उपलब्ध करून देते. परिणामी, देशातील हे सर्वांत वेगवान सर्च इंजिन असल्याचा दावाही धानाणी यांनी केला. तुम्हाला हवी असलेली माहिती इतर कोणतीही माहिती न देता थेट तीच माहिती उपलब्ध करून देते. त्यामुळे तुमच्या मोबाईलचा डाटाही कमी लागतो असेही धमाणी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - कार्यक्रम रद्द, मग शाळा-महाविद्यालये सुरू का? पालकांचा...
सध्या हे सर्च इंजिन भारताच्या एका लहान गटास उपलब्ध करून देण्यात आले असून या चाचण्यांद्वारे त्यामध्ये सुधारणा व बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे सर्च इंजिन सर्व युजर्सच्या सेवेत पूर्ण क्षमतेचे हजर झालेले आहे. सध्या जगभरामध्ये फेसबुकचे १ अब्ज ४४ कोटी अॅक्टिव्ह युजर्स आहेत. या युजर्सना फेसबुक वापरताना गुगलची आवश्यकता भासू नये, यासाठी क्यूमामने कंबर कसली आहे.
टाळेबंदीतून साकारले सर्च इंजिन -
अहमदाबाद येथील विज्ञान शाखेत १२ वीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर कम्युनिकेशन विभागात अभियांत्रिकी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. मात्र, शिक्षणात मन लागत नसल्याने त्याला जय महाराष्ट्र करून दररोजच्या लागणाऱ्या वस्तूंच्या विक्री करण्याच्या क्षेत्रात विक्री प्रतिनिधी म्हणून काम केले. २०१८ जानेवारीपासून अँडरॉईड अॅप्लिकेशन तयार केले. त्यातील ५० च्या जवळपास अॅप्लिकेशन वापरात आहेत. मात्र, भारतीय बनावटीचे एकही सर्च इंजिन नसल्याची बाब लक्षात आली. त्यामुळेच सुरक्षित आणि भारतीय बनावटीचे सर्च इंजिन तयार करण्याचा विचार मनात आला. त्यानुसार कामही सुरू केले. टाळेबंदीचा उपयोग हे सर्च इंजिन तयार करण्यात लावला आणि तब्बल सहा महिन्याच्या परिश्रमानंतर सर्च इंजिन तयार केले. २६ जानेवारी २०२१ मध्ये त्याच्या वापर सर्वत्र सुरू झालेला आहे.