‘स्‍मार्ट व्हिलेजेस’ करण्‍यासाठी गावांकडे चला; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

Nitin Gadkaris appeal to go to villages to make smart villages
Nitin Gadkaris appeal to go to villages to make smart villages

नागपूर : कृषी आणि ग्रामीण उत्‍थानाचे कार्य करणाऱ्या मनीष कुमार यांच्‍यासारख्या युवकांना एकत्र करून त्‍यांचे प्रयोग कोट्यवधी ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचविण्याची गरज देशाला आहे. गावांमध्‍ये जाऊन व्‍यवसाय करा, गावांना ‘स्‍मार्ट व्हिलेजेस’मध्‍ये रूपांतरित करण्‍यासाठी पुढे या, असे आवाहन सूक्ष्म, लघु व मध्‍यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्‍या राष्‍ट्रीय अधिवेशनाच्‍या दुसऱ्या दिवशी शनिवारी प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्‍कार समारोहाचे रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात आयोज‍न करण्‍यात आले होते. ‍यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. व्यासपीठावर अभाविपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष डॉ. छगन पटेल, राष्‍ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी, स्‍वागत समिती सचिव समय बनसोड, दक्षिण क्षेत्राचे संघटन मंत्री आनंद रघुनाथ उपस्थिती होते.

पूर्वी ८५ टक्‍के लोकसंख्‍या गावात राहायची. आता ३० टक्‍के लोकांनी शहरांमध्‍ये स्‍थलांतरण केले आहे. ग्रामीण क्षेत्राचा देशाच्‍या जीडीपीमध्‍ये केवळ १२ टक्‍के सहभाग राहिला आहे. ग्रामीण भागात होणाऱ्या उत्‍पादनांना भावच मिळत नसल्‍यामुळे शेतकऱ्यांची स्थिती खराब होत चालली आहे.

मनीष कुमार यांच्‍यासारखे युवक जैविक शेतीची गोष्‍टी करतात, ग्रामीण क्षेत्राच्‍या, शेतकऱ्यांच्‍या उन्‍नतीसाठी कार्य करताना बघून आनंद होतो. त्‍यांना प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्‍कार मिळाल्‍याबद्दल त्‍यांचे अभिनंदन करतो, असे नितीन गडकरी म्‍हणाले.

कृषी क्षेत्रातील उल्‍लेखनीय योगदानासाठी बिहारचे युवा कार्यकर्ते मनीष कुमार यांना नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आले. एक लाख रुपये रोख, स्‍मृतीचिन्‍ह, प्रमाणपत्र असे पुरस्‍काराचे स्‍वरूप होते.

सत्‍काराला उत्‍तर देताना मनीष कुमार म्‍हणाले, हा पुरस्‍कार माझ्यासाठी आशीर्वाद आहे. माझे आदर्श नानाजी देशमुख यांच्‍या प्रेरणेमुळेच गावात जाऊन कार्य करू शकलो. समाजासाठी, पृथ्‍वीच्‍या भल्‍यासाठी आणि भावी पिढीसाठी चांगले करावे, हेच त्‍यामागचे उद्दीष्‍ट आहे. संचालन नागपूर विभाग प्रमुख अजय चव्‍हाण यांनी केले.

आयुष्यात ‘जिनीयस’ व्‍यक्‍तींचा झाला स्‍पर्श

नितीन गडकरी यांनी यशवंतराव केळकर यांच्‍याशी संबंधित आठवणींना उजाळा दिला. अभाविपचे कार्य करीत असताना यशवंतराव केळकर, दत्‍तापंत ठेंगडी भाऊराव देवरस हे मार्गदर्शक म्‍हणून लाभले. त्‍यांचे कार्य आम्‍ही जवळून पाहिले. हे लोक ‘जिनीयस’ होते. या लोकांकडून मिळालेल्‍या संस्‍कारांमुळेच मला चांगले काम करण्‍याची प्रेरणा मिळते असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com