ब्रेकिंग नागपूर जिल्हा : जिल्हयात आता "या' तालुक्‍याने गाठली रूग्णांची "सेंच्युरी', कोणता तालुका आहे "हा'...

file
file

हिंगणा (जि.नागपूर) : मागील काही दिवसांपासून 96 वर थांबलेली कोरोनाची संख्या एमआयडीसीतील (बुटीबोरी) कारखान्यात नव्याने आलेल्या परप्रांतीय मजुरांमुळे अचानक वाढली. आज तालुक्‍यात 6 नवे रुग्ण वाढून रुग्णसंख्या102 वर पोहचली.

अधिक वाचा : पब्जीच्या वेडातून नैराश्‍य वाढल्याने युवतीने घेतला "हा' चुकीचा निर्णय...

नवे सहा रूग्ण आढळले
हिंगणा तालुक्‍याच्या सीमेत असलेल्या बुटीबोरी एमआयडीसीतील इंडोरामा कंपनीत परप्रांतातून आलेल्या दोन मजूरासह एक कार्यालयीन कर्मचारी तर फिसकॉन या कन्स्ट्रक्‍शन कंपनीचे दोन मजूर व विजवितरण कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. यात वरिल दोन्ही कारखान्यात परप्रांतातून मजुरांना आणण्यात आले होते. त्यांना कारखान्यातील क्वार्टरमध्ये ठेवण्यात आले होते. इंडोरामा कंपनीत तेथील कंत्राटदाराने बिहारवरून 11मजूर आणले होते. त्यांची खासगी प्रयोगशाळेत तपासणी केली. त्यातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यावरही तालुक्‍यातील आरोग्य विभाग किंवा स्थानिक ग्रामपंचायतीला सूचना दिली नाही. त्या दोन्ही पॉझिटिव्ह रुग्णांना थेट नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. त्यांचा शोध घेताना तालुका आरोग्य विभागाला चांगलीच कसरत करावी लागली, तर दुसऱ्या "फिसकॉन' कंपनीने देखील पश्‍चिम बंगाल येथून 44 मजूर एकाच गाडीत आणले. त्यांची सूचना स्थानिक प्रशासनाला दिली नाही.

अधिक वाचा : आजोबा नातू रात्रभर अंधारात बसले होते घरात लपून, काय झाले होते "त्यांना'...

प्रशासनाने सोडला होता सुटकेचा निःश्‍वास
शेवटी आरोग्य विभागाने शोध घेऊन काही मजुरांची तपासणी केली, तेव्हा दोन मजूर कोरोना पॉझिटिव्ह आढळले, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी प्रवीण पडवे यांनी दिली. तर परप्रांतातून आणणाऱ्या मजुरांची माहिती लपविल्यासंबंधी विभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांना सांगितले आहे. एकीकडे मागील आठवडाभर एकही रुग्ण पॉझिटिव्ह न आल्याने तालुक्‍यातील राजस्व, आरोग्य, पोलिस ,पंचायत समिती, ग्रामपंचायत प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला होता.

अधिक वाचा : डिगडोहचे साईनगरवासी विचारतात,14 ,28 दिवस की एक महिना, दोन महिने...

पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या 96 पैकी केवळ18 रुग्णांवर उपचार सुरू होते. बाकी सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. डिगडोह, वानाडोंगरी, भीमनगर येथील रुग्णसंख्या आटोक्‍यात आली असताना बाहेरून आणणाऱ्या मजुरांची माहिती स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाला अवश्‍य कळविण्यात यावी, अन्यथा त्या कारखान्यातील व्यवस्थापनावर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार संतोष खांडरे यांनी दिला आहे.

संपादन : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com