
शहरात चौकांमध्ये लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनवर वाढदिवस, लग्नाचा वाढदिवसासह व्यावसायिक जाहिरातीसाठी नागरिक, व्यापाऱ्यांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागपूर : महामेट्रोने उत्पन्न तसेच प्रवासी संख्या वाढविण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले. महामेट्रोच्या पावलावर पाऊल टाकत आता नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलोपमेन्ट कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएसएससीडीसीएल) उत्पन्न वाढीसाठी मार्ग शोधला. शहरात चौकांमध्ये लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनवर वाढदिवस, लग्नाचा वाढदिवसासह व्यावसायिक जाहिरातीसाठी नागरिक, व्यापाऱ्यांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हेही वाचा - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार
कंपनीने शहरातील प्रमुख ५१ चौकांमध्ये एलएडी लावले आहेत. यावर सध्या महापालिकेच्या विविध उपक्रमाची जनजागृती करण्यात येत आहे. आता या एलईडीवर व्यावसायिक तसेच वाढदिवस, लग्नाचा वाढदिवसाच्या जाहिराती प्रकाशित करून कंपनीला उत्पन्न मिळवून देण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी घेतला. शहरातील नागरिकांना आता मित्र, नातेवाईकांच्या वाढदिवस, लग्नाचा वाढदिवसासाठी या एलएडी स्क्रीनवर जाहिरात देणे शक्य होणार आहे.
हेही वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली
खालील चौकात लागले एलएडी -
शहरातील सावरकरनगर, शंकरनगर, ला कॉलेज चौक, लेडीज क्लब चौक, ५ मोहंमद रफी चौक, माटे चौक, आकाशवाणी चौक, जीपीओ चौक, भोले पेट्रोल पंप, संविधान चौक, व्हेरायटी चौक, कोका कोला चौक, मॉरिस कॉलेज चौक, झाशी राणी चौक, हिंगणा टी पॉईंट, जुना अमरावती नाका, नवीन काटोल नाका चौक, रवीनगर चौक, पागलखाना चौक, जरीपटका चौक, जरीपटका चौक, इंदोरा चौक, कडबी चौक, कमाल चौक, ऑटोमोटिव्ह चौक, कळमना मार्केट चौक, भारतवाडा चौक, महावीर चौक, हसनबाग चौक, सोना रेस्टॉरंट चौक, मेडिकल चौक, छोटा ताजबाग चौक, अग्रसेन चौक, मानस चौक, म्हाळगीनगर चौक, जयस्तंभ चौक, दही बाजार चौक, प्रतापनगर चौक, जुना काटोल नाका चौक, अशोक चौक, माऊंट कार्मेल शाळा चौक, रामनगर चौक, हॉटेल प्राईडपुढे, वर्धा रोड, मानकापूर क्रीडा संकुल, फुटाळा तलाव चौक, गोरेवाडा चौक, केटीनगर काटोल रोड, दिघोरी चौक, क्रीडा चौक, गोंडवाना चौक, एलएडी चौकात कंपनीने एलईडी स्क्रीन लावले आहेत.