पारशिवनीकरांनो आतातरी सावध व्हा, एक शतक झाले पूर्ण...

 कन्हान : कांद्री स्थित कोविड सेंटर येथे पाहणी करताना तहसीलदार सहारे.
कन्हान : कांद्री स्थित कोविड सेंटर येथे पाहणी करताना तहसीलदार सहारे.

टेकाडी (जि.नागपूर): गुरूवारी प्रशासनाची झोप उडवेल असा चाचणी अहवाल हाती आला. पारशिवनी तालुक्‍यातील कोरोनाबाधितांच्या संख्येचे अखेर शतक पूर्ण झाले. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याला जवाबदार कोण, असा प्रश्‍न चर्चिला जात आहे.

अधिक वाचा : नागपूर जिल्हा यंदा94.66 टक्‍क्‍यांनी "बल्ले बल्ले'

तालुक्‍यात 130 बाधितांची नोंद
बाधितांच्या संपर्कातील, अतीलक्षणे असलेले, लक्षणे नसलेले असेही रुग्ण दररोज घेण्यात येणाऱ्या तपासणी अहवालात पुढे येत आहेत. गुरुवारी (ता.30) चाचण्यांचा आलेल्या अहवालानुसार कन्हान येथील 7 तर कांद्री येथील एकाच कुटूंबातील दोघ बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर घेण्यात आलेल्या टेस्टमध्ये 27 इसम बाधित असून एक बाधित पारशिवनी तकीया मारोती येथील आहे. असा एकंदरीत गुरुवारी प्रशासनाची झोप उडवणारा धक्‍कादायक अहवाल अहवाल समोर आला. गुरुवारी 37 बाधित रुग्ण आढळले. या पद्धतीने तालुक्‍याने कोरोनाचे शतक पूर्ण झाले असून एकूण रुग्ण संख्या 130 इतकी झाली असल्याची माहिती तहसीलदार वरून कुमार सहारे आणि तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत वाघ यांनी दिली.

अधिक वाचा  : (video) शाब्बास पोरी, हलाखीची परिस्थिती,त्यातच वडीलांचे निधन, तरी मिळविले एवढे टक्‍के...

असा झाला शहरात शिरकाव
लॉकडाउन काळात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचललेली होती. जनता कर्फ्यू ते शिस्तीच्या संचारबंदीमध्ये तालुक्‍यातील कन्हान शहरातील रामनगर येथून 15 एप्रिल रोजी कोरोना रोगाने शिरकाव केला. तब्बल दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर 16 जून रोजी कांद्री येथे एक मृत
इसम बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर शहरात पुन्हा नव्याने बाधित रुग्ण आढळणार नाही अश्‍या दिशेने प्रशासनाचे प्रयत्न सुरू झाले. मात्र 11 जुलै रोजी कन्हान, पिपरी येथील एक युवक बाधित असल्याचे निष्पन्न झाले आणि सुरू झाला शहरात कोरोनाचा उद्रेक. एकट्या जुलै महिन्यात कोरोनाने शतक ओलांडणारा आकडा प्रशासनासमोर मांडला.

अधिक वाचा : नो टेंशन !ऍपद्वारे होणार आता अकरावीचे प्रवेश

कुठवर जाईल आकडा?
कन्हान, कांद्री, बोर्डा, टेकाडी, पालोरा आणि मेहंदी या गावांमध्ये कोरोनाने कमी जास्त प्रमाणात उद्रेक सुरू केला. यामध्ये11 जुलेै कन्हान येथील आढळलेला बाधितांची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले खरे, मात्र कन्हान पटेल नगरला 21 जुलै रोजी बाधित भाजीविक्रेत्याचा मृत्यू झाला आणि कोरोना संसर्गाचा सामूहिक प्रसार सुरू झाला असल्याची शक्‍यता प्रशासनाने वर्तविली होती. प्रशासनाने वाढता उद्रेक बघता कोरोना तपासणीचा वेग वाढविला आहे. 11 जुलै ते 30 जुलैपर्यंत कन्हान, कांद्री, टेकाडी येथील आकडा 126 वर जाऊन पोचला, तर बोर्डा, मेहंदी, पालोरा आणि पारशिवनी येथील एक एक रुग्ण मिळून बधितांचा आकडा अखेर 130 इतका जाऊन पोहचलेला आहे. त्यात दोन मृतांचा समावेश आहे.
 
संपादन  : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com