esakal | यंदा बाजारात ५०० कोटींची उलाढाल, कोरोनाच्या धास्तीने ऑनलाइन खरेदीला पसंती
sakal

बोलून बातमी शोधा

people like online shopping due to corona in nagpur

शुक्रवारपासून बाजारपेठेत ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने ५०० कोटींपेक्षा अधिकची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने ग्राहकांना स्थानिक बाजारातून खरेदी करण्याच्या मोहिमेला फाटा देत मोठ्या प्रमाणात ऑनलाइन खरेदीला पसंती दिली.

यंदा बाजारात ५०० कोटींची उलाढाल, कोरोनाच्या धास्तीने ऑनलाइन खरेदीला पसंती

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : कोरोनाने कोलमडलेल्या बाजारपेठेत दिवाळीनिमित्त चैतन्य आले. दिवाळीमुळे मागील सात महिन्यांपासून बाजारात असलेली मरगळ दूर होऊन नवी उभारी मिळाली. शुक्रवारपासून बाजारपेठेत ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने ५०० कोटींपेक्षा अधिकची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने ग्राहकांना स्थानिक बाजारातून खरेदी करण्याच्या मोहिमेला फाटा देत मोठ्या प्रमाणात ऑनलाइन खरेदीला पसंती दिली. त्यामुळे शहरातील अनेक भागात 'ऑनलाईन कंपनी'चे डिलिव्हरी बॉय साहित्य पोहोचविताना दिसत होते. 

हेही वाचा - मानवाच्या लाळेमध्ये आढळले पेनकिलर, मॉर्फिनपेक्षाही असते सहापट प्रभावी

दिवाळी भारतीय परंपरेतील सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त घराच्या रंगरंगोटीपासून विविध वस्तूंची खरेदी केली जाते. यंदा दिवाळी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आल्याने बहुसंख्य कर्मचाऱ्याचा पगार आणि बोनस पहिल्या आठवड्यात जमा झाला होता. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे सात महिन्यांपासून ग्राहक बाजारापासून दूर होते. गुढीपाडवा, अक्षयतृतीया, रक्षाबंधन, लग्नसराईसाठी होणाऱ्या खरेदीला 'ब्रेक' लागला होता. दिवाळी कर्मचाऱ्यांना मिळालेला बोनस, खरेदी न केल्याने सात महिन्यांपासून बँकेत जमा असलेला पैसा दिवाळीनिमित्त बाजारात आला. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स, कपडा, दुचाकी आणि चारचाकी वाहने, सोने-चांदी, फर्निचर, मोबाईल, रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी उलाढाल झाली. कोरोनाची भीती दूर सारून ग्राहकांनी बाजारात मोठी गर्दी केल्याने अनेक महिन्यानंतर व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 

हेही वाचा - 'आठ महिन्यांपासून मिळेल त्यावर पोट भरलंय,...

दसऱ्याला सलग दोन दिवस बाजारात गर्दी वाढली आणि अचानक गायब झाली. तसेच दिवाळीच्या तोंडावर बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली असली तरी पुढील काही दिवसांत पुन्हा बाजारात मरगळ येण्याची शक्यता आहे. ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीतीने पुन्हा येत्या काही दिवसांत बाजारातील ग्राहकांची वर्दळ गायब होण्याचे संकेत चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अ‌ॅण्ड ट्रेडचे (कॅमेट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी दिले. व्यापाऱ्यांनी या गर्दीमुळे हुरळून जाऊ नये. दुकानातील संपलेला माल खरेदी करताना थोडे सांभाळून करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. दिवाळीनिमित्त स्थानिक बाजारात अंदाजे ५०० कोटी उलाढाल झाली असावी. भाऊबीज व पाडव्याला थोडी फार खरेदी होईल, असेही अग्रवाल म्हणाले. 

हेही वाचा -

कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहकांनी ऑनलाइन खरेदीला पंसती दिल्याचे दिसत होते. त्यामुळे दिवाळीच्या दिवशीही अनेक भागात ऑनलाइन कंपनीचे डिलेव्हरी बॉय साहित्य पोहोचविण्यासाठी फिरताना दिसत होते. ऑनलाइन आणि स्थानिक बाजारातून ग्राहकांनी मोठी खरेदी केली. यात किती उलाढाल झाली हे सांगणे थोडे अवघड असल्याचे नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष हेमंत गांधी यांनी सांगितले.