'सब्र का पान मीठा होता हैं', वाचा काय आहे प्रकार... 

peoples desperate for PAN. Vendors shut
peoples desperate for PAN. Vendors shut

नागपूर : स्वादिष्ट भोजनाची रंगत वाढविणाऱ्या मसाला पानाची चव गेल्या तीन महिन्यांपासून नागपूरकरांनी घेतलेली नाही. नियमित मसाला पान खाणाऱ्यांना तर पानठेल्यांसमोरून जातानाही हळहळल्यासारखे होत असेल. त्यातही सावजी भोजन चाखल्यानंतर मसाला पान खाणारी मंडळींची तर चर्चाच नको. पण, "सब्र का फल मीठा होता हैं' इतकेच सध्या म्हणता येईल. 

कोरोनाच्या संकटामुळे शहरातील पानठेले बंद आहेत. त्यामुळे लज्जतदार भोजनानंतर मसाला पान खाण्याची सवय जोपासणाऱ्यांना हा आस्वाद कधी घेता येईल सांगता येत नाही. अनेक जण मसाला पान घरीच तयार करतात. पण, त्यास पानठेल्याची चव येत नसल्याचे देखील बोलून दाखवतात. विशेष म्हणजे बनारसी विडा बनविताना उपयोगात येणारी सामग्री घरगुती उपयोगात येत नसल्याने पान ठेल्याच्या मसाला पानाची प्रतीक्षा करण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही. 

कधीकाळी विडा खाणे म्हणजे कौटुंबिक सोपस्कार होता. नातलग, पाहुणेमंडळी किंवा मित्रमंडळी जमली की पानाचे तबक पुढे ठेवल्या जायचे. शिवाय भारतीय संस्कृतीत विड्याच्या पानाला मोठे महत्त्व आहे. घरी कोणतेही मंगलकार्य असल्यास विड्याच्या पानाचा उपयोग हमखास होतो. शिवाय नातेसंबंध जुळवताना पान सुपारीचा कार्यक्रम म्हणजे संस्कृतीचा भागच आहे. इतकेच नव्हे तर विड्याच्या पानाचे आयुर्वेदिक फायदेही आहेत. 

मसाला पान वातहारक, जंतुनाशक व कफनाशक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. काळ बदलत गेला तसा या सोपस्काराला व्यावसायिक रूप येत गेले. विड्याच्या पानाची जागा पानठेल्यांनी बळकविण्यास सुरुवात केली. लोक जेवण केल्यानंतर मुखशुद्धीसाठी मसाला पान खाऊ लागले. आज मात्र अंगवळणी पडलेली ही सवय कोरोनाच्या संकटामुळे बदलण्याची शक्‍यता आहे. 

कलारसिक किंवा साहित्य क्षेत्रातील मंडळी विडयाच्या पानाचे सेवन आवडीने करतात. विडा खाल्ल्यानंतर एकाग्रता वाढते असाही काहींचा समज आहे. अनेकजण तोंड आल्यानंतर, खोकला, त्वचारोग निवारणासाठी विड्याचे पान खातात. आज मात्र हा गुणकारी पदार्थ कोरोनाच्या संकटात सापडला इतकेच म्हणता येईल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com