नवऱ्याला पैसे काय मागायचे असं म्हणत केली व्यवसायाला सुरुवात; लोणच, जॅमने मिळवून दिली वेगळी ओळख

Pickles gave Varsha a new identity woman success story
Pickles gave Varsha a new identity woman success story

नागपूर : भारतीय संस्कृतीत महिलांना पाहिजे स्थान अद्याप मिळालेले नाही. पत्नी म्हणजे घरचे काम करणारी, तिला बाहेरील जगातले काहीही समजत नाही, अशी जवळपास प्रत्येक माणसाची समज झाली आहे. यामुळे महिला नेहमी मागे राहिल्या. पती, मुलं आणि घराची जबाबदारी सांभाळता सांभाळता अनेक महिला आपल्या आवडी-निवडी विसरून बसल्या. आपल्यासाठी काही करायचं, स्वप्न पूर्ण करायचे जणू याचा त्यांना विसरच झाला. यालाच पुरुषांनी दुर्बल महिला असे नाव दिले. मात्र, वर्षा साखरे या अपवाद ठरल्या.

आजच्या २१ व्या शतकात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरत आहे. मोठे मोठ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. राजकारणातही मोठ-मोठी जबाबदारी पार पाडत असल्याचे आपल्याला दिसून येते. अनेक कंपन्यांच्या मोठ्या पदावर महिला अधिकारी विराजमान असल्याचे आपल्याला दिसून येते. यावरून महिलांची प्रगती झाली असे दिसते. दुसरीकडे घर सांभाळणाऱ्या महिलांचीही समाजात काही कमी नाही.

अधिक वाचा - भाजपसाठी धोक्याची घंटा! सर्वेक्षणातून समोर आला धक्कादायक निष्कर्ष; नेत्यांची चिंता वाढली

अशा अनेक महिला आहेत ज्यांचा कुटुंबाच्या आर्थिक उत्पादनात नगन्य सहभाग आहे. याचा अर्थ त्यांना बाहेर जाऊन नोकरी करता येत नाही किंवा काही करण्याची इच्छा नाही असा होत नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना आपल्या स्वप्नांचा त्यांना विसर पडला आहे. खरं सांगायचं झाल तर त्यांनी कुटुंबालाच आपली नोकरी समजून घेतली आहे. अशा महिलांना योग्य दिशा मिळाल्यास कुटुंबाची जबाबदारी पार पाडता पाडता उत्पन्नाचे स्त्रोतही ते शोधू शकतात.

नागपुरातील कौशल्यनगर येथील महिलांच्या एचसीएल फाउंडेशन, महिला बाल आणि युवा विकास राष्ट्रीय संस्था महिलांसाठी कार्य करीत असल्याची माहिती वर्षा साखरे यांना मिळाली. जीवनात काहीतरी करण्याच्या उद्देशाने त्या संस्थेशी जुळल्या. बारावीपर्यंत शिकलेल्या वर्षा लग्नाआधी खाजगी नोकरी करीत होत्या. २०११ मध्ये त्यांचे लग्न झाले. कुटुंबाची व मुलांचा सांभाळ करताना वर्षा यांचा स्वतः स्वावलंबी होण्याचे स्वप्न मागे राहून गेले.

मात्र, घराजवळच एका विहारात पार पडलेल्या बैठकीने त्यांच्या जीवनाला नवी दिशा दिली. ही बैठक महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी आयोजिण्यात आली होती. यात वर्षा यांनी कृषी उत्पादन प्रक्रिया व विपणन याचे प्रशिक्षण घेण्याची तयारी दर्शवली. हे कार्य एकट्याने साध्य होणार नाही, याची त्यांना पूर्ण कल्पना होती. हे लक्षात घेऊनच पंधरा महिलांचा ‘संघटित महिला स्वयं सहायता समूह’ नावाने गट तयार केला.

यातून महिलांनी दीर्घकाळ टिकणारे सर्व प्रकारचे लोणचे, जॅम, जेली, कँडी तयार करण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. आता या महिला अनेक ठिकाणी स्वतःच्या पदार्थांचे स्टॉल लावतात. यातून त्यांना रोजगार मिळाला असून, जगण्यासाठी नवीन दिशा मिळाली आहे. कौटुंबिक जबाबदारी पार पाडत वर्षा सारखे आपला रोजगार सांभाळत आहे. यातून त्या स्वयंसिद्ध झाल्या आहेत.

पदार्थांची ऑनलाइन विक्री

सगळं यश आम्हाला एकाएकी मिळालेले नाही. सुरुवातीचे काही महिने फार अडचणीचे गेले. यावेळी नैराश्य मनात घरी करीत होते. मात्र, एकजुटीने केलेल्या प्रयत्नामुळे यश आमच्या पदरी पडले. आता व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांतून महिला आपल्या कुटुंबाला हातभार लावतात. एवढेच नव्हे तर स्वतःच्या आत्मविश्‍वासाच्या बळावर या महिलांनी आपले पदार्थ ऑनलाइन विकण्यास सुरुवात देखील केली आहे.

महिलांनी व्हावे स्वावलंबी
आधी प्रत्येक व्यवहार करताना पतीकडे हात पसरवावे लागत होते. त्यातही घरची परिस्थिती बेताची असल्याने अनेक अडचणी होत्या. मात्र, आता स्वतः कमावत असल्याचा आनंद काही वेगळाच आहे. आपल्या समाजात गृहिणी म्हणून कार्य करणाऱ्या अनेक महिला आहेत. त्यांनी देखील छोट्यात छोटे कार्य सुरू करून स्वावलंबी बनायला पाहिजे.
- वर्षा साखरे

आर्थिक व्यवहारात माझा देखील सहभाग

प्रत्येक लहान-मोठ्या कार्यासाठी पतीकडे हात पसरवावे लागत होते. पतीला पैसे मागण्यात काहीही हरकत नाही. मात्र, मनात कुठेतरी हे सलत होते. मात्र, आता हा संकोच नाहीसा झाला आहे. व्यवसायामुळे घरातील आर्थिक व्यवहारात माझा देखील सहभाग वाढल्याने आनंद वाटतो, असे वर्षा साखरे सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com