esakal | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे नागपूर कनेक्शन नक्की आहे तरी काय?
sakal

बोलून बातमी शोधा

president Jo Biden has some Nagpur connection

२०१३ साली अमेरिकेचे उपाध्यक्ष असताना जो बायडेन हे मुबंईत आले होते. यावेळी कोणीतरी दूरचे नातेवाईक महाराष्ट्रातील नागपुरात राहतात असे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे नागपूर कनेक्शन नक्की आहे तरी काय?

sakal_logo
By
टीम ई सकाळ, सकाळवृत्तसेवा

नागपूर : अमेरिकेत काही दिवसांपूर्वीच राष्ट्राध्यक्ष पदासाठीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये डेमोक्रेटीक पक्षाचे जो बायडेन विजयी झाले. ते अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष आहेत. तसेच भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना उपाध्यक्ष बनण्याचा मान मिळाला आहे. मात्र आता जो बायडेन यांचे भारत कनेक्शन समोर आले आहे. आपले दूरचे नातेवाईक महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये राहतात असे बायडेन यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष असतना सांगितले होते. 

२०१३ साली अमेरिकेचे उपाध्यक्ष असताना जो बायडेन हे मुबंईत आले होते. यावेळी कोणीतरी दूरचे नातेवाईक महाराष्ट्रातील नागपुरात राहतात असे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते. बायडेन यांच्या म्हणण्याप्रमाणे १९७२ साली त्यांना नागपुरातून एक पत्र मिळाले होते. या पत्रात बायडेन यांचे पूर्वज 'ईस्ट इंडिया कंपनी'मध्ये होते याबद्दल त्यांना माहिती झाले होते. 

हेही वाचा - मोबाईलवर पत्ता शोधताना झाला मित्राचा अपघात आणि दोन तरुणांनी थेट बनवले 'परिभ्रमण'

हे पत्र जो बायडेन यांना नागपुरात राहत असणाऱ्या लेस्ली बायडेन यांनी लिहिले होते. लेस्ली या नागपुरात राहत होत्या. लेस्ली यांच्या नातीने त्यांचे कुटुंब १८७३ पासून नागपुरात राहते असा दावा केला आहे. बायडेन कुटुंब नागपुरात आणि संपूर्ण भारतात आहे असे लेस्ली यांची नात सोनिया बायडेन फ्रान्सिस यांनी म्हंटले आहे. 

१९८१ ला लिहिले होते पत्र

लेस्ली या भारत हॉटेल अँड लॉजच्या मॅनेजर होत्या. त्यांनी १५ एप्रिल १९८१ रोजी जो बायडेन यांना पत्र लिहिले होते. या पत्राचे उत्तर जो बायडेन यांनी ३० मे १९८१ रोजी दिले होते. भारतातून पत्र मिळाल्यांनतर आणि आपल्या पूर्वजांबद्दल माहिती मिळाल्यानंतर जो बायडेन खुश झाले होते असे सोनिया यांनी सांगितले आहे. 

२०१८ मध्ये झाली होती संपूर्ण बायडेन कुटुंबाची भेट

भारत,अमेरिका ,न्यूझीलंड इथे राहणारे संपूर्ण बायडेन कुटुंबीय लेस्ली बायडेन यांच्या नातवाच्या लग्नाला एकत्र आले होते. तसंच लेस्ली यांची मुलगी आणि त्यांचे कुटुंबीय मुंबई राहत असल्याची माहितीही सोनिया यांनी दिली आहे.

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

५ बायडेन मुंबईत राहतात 

सिनेट सदस्य असताना जो बायडेन मुंबईला आले होते त्यावेळी त्यांनी भाषणादरम्यान मुंबई आणि नागपूरमध्ये राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांचा उल्लेख केला होता. तसेच ५ बायडेन मुंबईत राहतात असंही ते भाषणादरम्यान सांगण्यास विसरले नाहीत. ते आपल्या दूरच्या नातेवाईकांना लवकरच फोनही करणार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले होते.          
  
संपादन - अथर्व महांकाळ